जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे शहरात १५ ठिकाणी वॉटर कुलर स्थापन; माजी सैनिक पाल्य वसतिगृहात महापौरांच्या हस्ते लोकार्पण

ऐन उन्हाळ्यात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रायसोनी फाऊंडेशनचा समाजोपयोगी पुढाकार; नागरिक, विद्यार्थी व प्रवाशांसाठी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय

जळगाव, ता. १०  : शहरातील शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय हे विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या सामाजिक जाणिवेतून संस्थेच्या रायसोनी फाऊंडेशनतर्फे शहरातील विविध सार्वजनिक व शैक्षणिक ठिकाणी बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वॉटर कुलर उपक्रमांतर्गत माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहात बसविण्यात आलेल्या वॉटर कुलरचे लोकार्पण शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.

या वॉटर कुलरचे लोकार्पण जळगाव महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल उपस्थित होत्या. या प्रसंगी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थेच्या या समाजोपयोगी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी नमूद केले की, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट हे केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे केंद्र नसून समाजाशी घट्ट नाते जपणारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांच्या सामाजिक व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली संस्थेमार्फत वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, जबाबदारीची भावना आणि समाजाप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील अनेक सार्वजनिक व शैक्षणिक ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवते, ही बाब लक्षात घेऊन रायसोनी फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरातील विविध महत्त्वाच्या व मध्यवर्ती ठिकाणांची पाहणी करून तेथे उत्कृष्ट दर्जाचे वॉटर कुलर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, प्रवासी तसेच विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या लोकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे. समाजातील गरज ओळखून त्या दिशेने सकारात्मक पावले उचलणे ही प्रत्येक शैक्षणिक संस्थेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काळातही रायसोनी फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती, सामाजिक मदत आणि विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना महापौर श्रीमती दीपमाला काळे यांनी जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची व समाजोपयोगी बाब आहे. शिक्षण संस्थांनी समाजातील गरजा ओळखून अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब असून जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटने शहरातील विविध ठिकाणी वॉटर कुलर बसवून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. अशा उपक्रमांमुळे इतर संस्थांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक सुबेदार समाधान धनगर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अशा प्रकारच्या उपक्रमांची नेहमीच अपेक्षा असते. जी. एच. रायसोनी महाविध्यालयाने ऐन उन्हाळ्यात आमच्या वसतिगृहात उत्कृष्ट दर्जाचे वॉटर कुलर मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या वॉटर कुलरमुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार असून हा उपक्रम आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. याबद्दल त्यांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या प्रसंगी रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन येणाऱ्या काळातही शहरातील गरजवंत व महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

जळगाव शहरातील या १५ ठिकाणी बसविण्यात आले “वॉटर कुलर”

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या रायसोनी फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरातील विविध सार्वजनिक व शैक्षणिक ठिकाणी एकूण १५ उत्कृष्ट दर्जाचे वॉटर कुलर बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये समाज कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नवीन बस स्थानक, बालसुधारगृह, लुंकड कन्या शाळा (गणेश कॉलनी), संत ज्ञानेश्वर स्कूल (रामेश्वर कॉलनी), ब्राह्मण सभा मंगल कार्यालय, उडान मतिमंद स्कूल – (पाच नंबर शाळा, मनपा), श्री स्वामी समर्थ केंद्र (गणपती नगर), श्रीमती आनंदीबाई देशमुख बालक मंदिर शाळा (नवी पेठ, जळगाव), जिजामाता माध्यमिक विद्यालय (हरिविठ्ठल नगर परिसर, जळगाव), सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय (शिरसोली पी.बी., जळगाव), माजी सैनिकांचे मुलांचे वसतिगृह (जळगाव) तसेच हनुमान मंदिर (माजी सैनिक सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) या ठिकाणांचा समावेश आहे.

या उपक्रमामुळे जळगाव शहरातील नागरिक, विद्यार्थी व प्रवाशांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होत असून संस्थेच्या या समाजोपयोगी पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण