छ. संभाजी राजे नाट्यगृहात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या “उडान २०२६”मधून चमकली नृत्यतारे

नामांकित परीक्षकांची उपस्थिती; विविध नृत्यप्रकारांच्या सादरीकरणांनी रंगत, स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा देखणा आविष्कार

जळगाव, ता. २७ : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे आयोजित “उडान २०२६” ही आंतरशालेय नृत्य स्पर्धा आज मोठ्या उत्साहात छ. संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ, जळगाव येथे संपन्न झाली. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधून आयोजित या स्पर्धेत ताल, लय आणि अभिव्यक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सोनल तिवारी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी स्कूलच्या शैक्षणिक, कला, क्रीडा व सर्वांगीण विकासातील सातत्यपूर्ण प्रगतीचा आलेख मांडला. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगत विविध मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नृत्य ही केवळ कला नसून आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास घडवणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या स्पर्धेसाठी “DID” व “DMD” या दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांमधून प्रसिद्धी मिळवलेले नामांकित नृत्यकलाकार दीपक हुलसुरे हे सेलिब्रिटी परीक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच नंदुरबार येथील कृष्णा बोरसे हे दुसरे परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे कौतुक करत नृत्यातील तंत्र, अभिव्यक्ती आणि सादरीकरण कौशल्यांबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. “Cultural Beats Unleashed” या थीमवर आधारित सोलो (एकल) आणि ग्रुप (समूह) अशा दोन गटांमध्ये स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत इतर शाळांसाठीही सहभाग खुला ठेवण्यात आल्यामुळे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध नृत्यप्रकारांच्या आकर्षक सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संचालिका पलकजी रायसोनी यांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्यांना चालना मिळून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे 

सोलो डान्स गट

विजेती – सिरीन शेख

उपविजेती – अर्शिता गोविंदानी

ग्रुप डान्स गट

विजेते – सोनाली अँड ग्रुप

उपविजेते – पूर्वजा अँड ग्रुप

विजेत्यांना रोख पारितोषिके, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एकूणच “उडान २०२६” ही नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरली.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण