जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘स्टार्टअप्स अँड एंटरप्रेन्युअरशिप’ कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे
‘आयडिया टू ॲक्शन’चा दिला मंत्र; प्रा. प्रसाद तिगलपल्ली यांच्या मार्गदर्शनातून स्टार्टअप उभारणी, उद्योजकीय मानसिकता व फंडिंगच्या संधींचे विद्यार्थ्यांना धडे
जळगाव, ता. ३१ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड
मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या डिपार्टमेंट
ऑफ मॅनेजमेंटतर्फे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) व इनक्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने
तसेच JITO यूथ
जळगाव यांच्या सहयोगाने ‘स्टार्टअप्स अँड एंटरप्रेन्युअरशिप’ या विषयावर
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘लर्न. प्लॅन. लॉन्च. सक्सीड.’ या संकल्पनेवर
आधारित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्टार्टअपची संकल्पना, व्यवसायाची कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणणे,
उद्योजकीय मानसिकता,
शाश्वत स्टार्टअप
उभारणी तसेच फंडिंगच्या विविध संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने
झाली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी
सांगितले की, आजच्या
वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक जगात विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअरच्या
संधींचा विचार न करता आपल्या कल्पना, कौशल्ये आणि ज्ञानाच्या माध्यमातून नवीन संधी निर्माण करण्याचा
दृष्टिकोन ठेवला पाहिजे. स्टार्टअप म्हणजे केवळ व्यवसाय सुरू करणे नव्हे, तर समाजाच्या गरजा आणि समस्या ओळखून
त्यावर नाविन्यपूर्ण, उपयुक्त
आणि बाजारपेठेत टिकणारा उपाय विकसित करणे होय.
विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमातील ज्ञानाला प्रत्यक्ष
अनुभवाची जोड देत इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी,
रिस्क टेकिंग आणि
प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या कौशल्यांचा विकास करावा. आपल्या कल्पनांना योग्य दिशा
देण्यासाठी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटर आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन
कौन्सिलच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या संधींचा
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे
आवाहनही त्यांनी केले. भविष्यातील विद्यार्थी हे केवळ नोकरी शोधणारे नव्हे,
तर रोजगार निर्माण
करणारे उद्योजक बनावेत, हा
या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर आयआयएम मुंबई येथील स्टुडंट स्टार्ट-अप्सचे प्रा.
प्रसाद तिगलपल्ली यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘मंडी सर’ म्हणून ओळखले
जाणारे प्रा. तिगलपल्ली यांनी ‘व्हॉट इज अ स्टार्टअप?’, ‘आयडिया टू ॲक्शन’, ‘एंटरप्रेन्युअरियल माइंडसेट’, ‘बिल्डिंग अ सस्टेनेबल स्टार्टअप’ आणि
‘फंडिंग अँड बियॉन्ड’ या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक
व्यावसायिक बदलांमुळे शिक्षणपद्धतीतही आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. पारंपरिक
शिक्षण व नोकरीच्या चौकटीपलीकडे जाऊन आज नवनवीन उद्योगधंदे आणि व्यवसाय उदयास येत
आहेत. या नव्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये करिअर घडवायचे असल्यास त्या
क्षेत्राशी संबंधित विषयांमध्ये पारंगत होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी
आपली कौशल्ये आणि अभ्यासक्रम यांची योग्य सांगड घालून शिक्षण पूर्ण केल्यास
भविष्यात संबंधित क्षेत्रांमध्ये करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसायाची कल्पना मांडणे, त्यावर काम करणे आणि व्यवसायाचा विस्तार
करणे एवढ्यापुरती मर्यादित नसून, नाविन्यपूर्ण
व जगावेगळ्या विचारातून आपले उत्पादन जागतिक दर्जाचे व सर्वोत्तम बनवणे, हेच खरे उद्योजकतेचे सार असल्याचे
त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी अपयशाची भीती न बाळगता प्रयोगशील वृत्ती
जोपासावी आणि आपल्या कल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी, असा संदेश त्यांनी दिला.
त्यांच्या संवादात्मक, उत्स्फूर्त आणि प्रभावी शैलीतील या मार्गदर्शनाचा
विद्यार्थ्यांवर चांगला प्रभाव पडला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग
नोंदवत स्टार्टअप व उद्योजकतेशी संबंधित विविध पैलू समजून घेतले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती जाखेटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IIC कन्व्हेनर डॉ. निलाभ दिश, JITO यूथ जळगावचे चेअरमन अभिषेक राखेचा आणि
चीफ सेक्रेटरी हर्षल कटारिया यांनी समन्वय साधला.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना स्टार्टअपची कल्पना, नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी, प्रॉडक्ट ट्रेनिंग, उद्योजकीय मानसिकता, शाश्वत व्यवसाय उभारणी व फंडिंगच्या संधी यांचा व्यावहारिक दृष्टिकोन मिळाला. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरल्याची भावना जी. एच. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केली.
.jpeg)


Comments
Post a Comment