'एक वृक्ष – एक जीवन' उपक्रमांतर्गत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात वृक्षारोपण
दिव्य मराठीच्या पर्यावरण जनजागृती अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांचे कौतुक
जळगाव, ता. १७ : दिव्य मराठी वृत्तपत्राच्या 'एक वृक्ष – एक जीवन' या पर्यावरण संवर्धन अभियानांतर्गत जी.
एच. रायसोनी पब्लिक स्कूल, सावखेडा
शिवार, जळगाव
येथे उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरण
संरक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन
करण्याचा संकल्प केला.
यावेळी शाळेच्या
मुख्याध्यापिका क्रीस्टाबेल परेरा तसेच ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर अजय नोहा यांच्या
प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना
वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, जैवविविधतेचे
संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता
याविषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी
विद्यार्थ्यांना प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचे
आवाहन करण्यात आले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे संरक्षण करत नाहीत, तर शुद्ध हवा, पाणी आणि समृद्ध जैवविविधतेचे आधारस्तंभ
असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
जी. एच. रायसोनी
ग्रुपच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत,
पर्यावरण
संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करणारे असे
उपक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. शालेय जीवनातच निसर्गप्रेम आणि पर्यावरण
संरक्षणाची जाणीव निर्माण झाल्यास भविष्यात अधिक जबाबदार नागरिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वृक्षारोपण उपक्रमात शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून 'एक वृक्ष – एक जीवन' या अभियानाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

.jpeg)


Comments
Post a Comment