जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘एनईपी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन’मधून नव्या शैक्षणिक पर्वाचा जागर
‘मेरी एनईपी की समझ’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते प्राध्यापकांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘एनईपी २०२० इन प्रॅक्टिस’ पुस्तकाचे प्रकाशन
जळगाव, ता. २९ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०च्या माध्यमातून भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाचा आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा जागर करण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात ‘एनईपी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन – २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या विविध पैलूंवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने
झाली. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित होत्या. यानंतर डॉ.
बिपासा बी. पात्रा यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची भूमिका व उद्देश
स्पष्ट केला. यावेळी ‘एनईपी २०२० इन प्रॅक्टिस : ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन –
द जीएचआरसीईएम एक्सपिरियन्स’ या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या लेखणीतून
साकारलेल्या पुस्तकाचे प्रकाशन संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल आणि अकॅडमिक डीन
प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या
अनुषंगाने महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धती तसेच
बदलत्या उच्च शिक्षण व्यवस्थेतील महाविद्यालयाचा अनुभव या पुस्तकातून अधोरेखित
करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी एनईपी
२०२०च्या अंमलबजावणीतील महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या
की, २०२०मध्ये
महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला, त्याच काळात एनईपी २०२०ची अंमलबजावणी
आणि कोविड-१९चे आव्हान अशी तिहेरी आव्हाने महाविद्यालयासमोर होती. या सर्वांचा
यशस्वीपणे सामना करत महाविद्यालयाने एनईपीच्या उद्दिष्टांशी सुसंगत शैक्षणिक
व्यवस्था प्रभावीपणे राबविली. क्रेडिट ट्रान्सफर योजना, मल्टिपल एंट्री-मल्टिपल एक्झिट व्यवस्था,
एकाच वेळी दोन पदवी
अभ्यासक्रम करण्याची संधी तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या भाषेत परीक्षा
लिहिण्याची मुभा अशा एनईपीच्या विविध वैशिष्ट्यांची महाविद्यालयात प्रभावी
अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत
तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील नेतृत्व घडविणे हे
महाविद्यालयाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून प्रा. डॉ. अग्रवाल यांनी वर्गातील
सैद्धांतिक शिक्षणासोबतच वर्गाबाहेरील विविध उपक्रमांना महत्त्व दिले जात असल्याचे
स्पष्ट केले. एनपीटीईएल, स्वयम
आणि एमओओसीसारख्या ऑनलाइन अभ्यासक्रमांचा अभ्यासक्रमात समावेश, विविध सहशैक्षणिक उपक्रमांना क्रेडिट्सची
जोड, तसेच
बहुविषयक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय
निवडण्याची संधी देण्यात येत आहे. आयकेएस सेल, लिबरल लर्निंग सेल, एनईपी सेल, एनईपी सारथी, स्कूल कनेक्ट प्रोग्राम, उन्नत भारत अभियान आणि सीएसआर सेलच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ३६० अंशांतील सर्वांगीण विकासासाठी विविध संधी
उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. एनईपीच्या प्रभावी
अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात होत असलेला सकारात्मक बदल हीच
या वाटचालीची खरी फलश्रुती असून, ही
शैक्षणिक यात्रा भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन
त्यांनी केले.
यानंतर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरांवर झालेल्या चर्चा, मार्गदर्शनपर सत्रे आणि तज्ज्ञांच्या विचारमंथनातून या धोरणाची व्यापकता आणि त्याच्या अंमलबजावणीतील विविध पैलू समजून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणपद्धतीसोबतच कौशल्याधारित शिक्षण, नवोपक्रम, सर्जनशीलता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि व्यावहारिक ज्ञान यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. एनईपी २०२०च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-क्षमता आणि भविष्यातील गरजांनुसार शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बदलत्या काळातील संधी ओळखून स्वतःला केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता आवश्यक कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक आव्हानांसाठी सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या ‘मेरी एनईपी की समझ’ या वक्तृत्व
स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शाखा आणि विविध
वर्षांतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धती,
कौशल्याधारित शिक्षण,
नवोपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, बहुविषयक शिक्षण तसेच भविष्यातील रोजगाराच्या
संधी यांसारख्या विविध विषयांवर आपले विचार मांडले.
या वक्तृत्व स्पर्धेत धीरजकुमार सुनील पाटील (अंतिम वर्ष,
आयटी), ओम गजानन मंगलकर (तृतीय वर्ष, सिव्हिल), हेमाक्षी माळी (तृतीय वर्ष, सिव्हिल), गायत्री भालचंद्र व्याव्हारे (द्वितीय
वर्ष, एआयएमएल),
प्रांजली धाडी (अंतिम
वर्ष, बीसीए),
मृणालिनी कासार
(तृतीय वर्ष, इलेक्ट्रिकल),
यश ठाकरे (तृतीय वर्ष,
इलेक्ट्रिकल),
देविदास सुनील बारी
(अंतिम वर्ष, मेकॅनिकल),
अस्मिता उमेश हाडप
(द्वितीय वर्ष, बीबीए),
माधवी सोनवणे
(द्वितीय वर्ष, डीएस)
आणि प्रज्ञा मधुकर सोनार (द्वितीय वर्ष, एआय) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून एनईपी २०२० ही केवळ शिक्षण क्षेत्रातील सुधारणा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी आणि उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारी परिवर्तनशील संकल्पना आहे, हा विचार प्रभावीपणे मांडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वक्तृत्व स्पर्धेला विचारमंथनाचे स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर
वक्तृत्व स्पर्धेच्या निकालांची घोषणा करण्यात आली. एनईपी २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीसह
विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जगासाठी सक्षम करण्याच्या दिशेने
आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील
महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
‘एनईपी २०२० इन प्रॅक्टिस : ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन – द जीएचआरसीईएम एक्सपिरियन्स’ या संकल्पनेतून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याधारित आणि नवोपक्रमशील शिक्षणाचा दृष्टिकोन अधोरेखित झाला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच त्यांना नव्या शैक्षणिक पर्वातील संधी आणि आव्हानांची जाणीव करून देण्यात आली. एनईपी २०२०च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त करत, अशाच प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची भावना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केली.

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
Comments
Post a Comment