युवा कौशल्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचा ‘टीच वन, इन्स्पायर वन’ उपक्रम
समाजाभिमुख उपक्रमातून रोटरॅक्ट क्लबच्या संयुक्त विद्यमाने शहरातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना इंग्रजी संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन
जळगाव, दि.
१६ : आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनानिमित्त जी.
एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी
जळगावतर्फे रोटरॅक्ट क्लब ऑफ युनायटेड रांची यांच्या सहकार्याने ‘टीच वन, इन्स्पायर वन’ या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन राज
माध्यमिक विद्यालय, मेहरूण,
जळगाव येथे करण्यात
आले. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संवादकौशल्य विकसित
करणे, सार्वजनिकरीत्या
आत्मविश्वासाने बोलण्याची क्षमता वाढविणे, विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी
प्रोत्साहित करणे तसेच कौशल्याधारित शिक्षणाची गोडी निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमात महाविध्यालयातील विध्यार्थी स्वयंसेवकांनी
विद्यार्थ्यांसोबत विविध संवादात्मक उपक्रम, इंग्रजी संभाषणाचा सराव, गटचर्चा, प्रश्नोत्तरे आणि प्रेरणादायी कृतींचे
आयोजन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत इंग्रजीत संवाद साधण्याचा
प्रयत्न केला. संवादात्मक शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास
मदत झाली तसेच भविष्यातील शिक्षण आणि करिअरसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची जाणीव
त्यांच्यामध्ये निर्माण झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी भाषा
शिकण्याची प्रेरणा मिळाली नाही, तर
प्रभावी संवाद, नेतृत्वगुण,
संघभावना आणि
व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वही समजले. विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांशी मुक्तपणे
संवाद साधत विविध शंका विचारल्या आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता व्यक्त केली.
यावेळी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ.
प्रीती अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "आजच्या स्पर्धात्मक युगात पदवीसोबतच
कौशल्येही तितकीच महत्त्वाची आहेत. इंग्रजी संवादकौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रभावी अभिव्यक्ती ही
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण संस्थांनी
समाजाभिमुख उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान आणि कौशल्ये पोहोचविण्याची
जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ‘टीच वन, इन्स्पायर वन’ सारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य शिकण्याची
प्रेरणा निर्माण करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवतात."
कार्यक्रमासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे अॅकॅडमिक डीन
प्रा. डॉ. संजय शेखावत, समन्वयक
प्रा. श्रिया कोगटा, रोटरॅक्ट
क्लब ऑफ रायसोनी जळगावचे अध्यक्ष सात्विक दीक्षित, सचिव विवेक भंगाळे तसेच हर्षाली सपकाळे,
हुजेफा शेख, आदित्य टोप्पो, अर्शद खान, इराम सय्यद यांचे विशेष मार्गदर्शन व
सहकार्य लाभले.
"विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,
समाजाभिमुख शिक्षण
आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट
भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत राहील," अशी भावना जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केली.


.jpeg)


Comments
Post a Comment