आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जी. एच. रायसोनी महाविद्यालयात भक्तिमय उत्साह; ‘आषाढी स्वादोत्सवा’सह वारकरी परंपरेचा जागर
‘परंपरेची चव, आनंदाचा ठेवा’ उपक्रमातून संस्कृती, परंपरा आणि आरोग्यदायी आहाराचा संदेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव, दि.
२४ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विविध उपक्रमांचे
आयोजन करून आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात
आला. विभागीय सांस्कृतिक क्लब आणि इन्स्टिट्यूट्स बेकर्स क्लब यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून
तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थ सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक
परंपरेचे दर्शन घडविले.
महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विभागाच्या
सांस्कृतिक क्लबतर्फे ‘आषाढी एकादशी उत्सव – पंढरीच्या वारीचा उत्सव’ या उपक्रमाचे
आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत, तर विद्यार्थ्यांनी धोतर-कुर्ता परिधान
करून उत्साहात सहभाग नोंदविला. पंढरीच्या वारीची भक्तिमय परंपरा, वारकरी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या
लोकजीवनाशी असलेले तिचे अतूट नाते विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून अनुभवले.
यासोबतच इन्स्टिट्यूट्स बेकर्स क्लबतर्फे ‘आषाढी स्वादोत्सव –
परंपरेची चव, आनंदाचा
ठेवा!’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या
कल्पकतेतून आणि कौशल्यातून तयार केलेले विविध पारंपरिक, रुचकर व पौष्टिक खाद्यपदार्थ सादर करत
महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा अनोखा आस्वाद उपस्थितांना दिला. या
उपक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक खाद्यपदार्थ आणि पाककलेचा वारसा जपण्यासोबतच
पौष्टिक, स्वच्छ
व आरोग्यदायी आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त
सहभागामुळे ‘आषाढी स्वादोत्सव’ हा उपक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ.
प्रिती अग्रवाल यांनी आषाढी एकादशीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित
केले. आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा
आणि वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमधून
विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि मूल्यांशी जोडण्याची संधी मिळते. आधुनिक
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत
पोहोचविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विभागाच्या
सांस्कृतिक क्लबचे विद्यार्थी समन्वयक ओम जयाले, फॅकल्टी समन्वयक प्रा. निकी वेद आणि
विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी नियोजन व समन्वय साधले. तसेच इन्स्टिट्यूट्स
बेकर्स क्लबच्या फॅकल्टी समन्वयक प्रा. श्वेता चौधरी व प्रा. रुपाली येवले तसेच
योगशिक्षक कृणाल महाजन यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन्ही उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषा, भक्तिमय वातावरण आणि पारंपरिक खाद्यपदार्थांच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरात आषाढी एकादशीच्या उत्सवाला सांस्कृतिक आणि आनंदमय स्वरूप प्राप्त झाले.
.jpeg)



.jpeg)
Comments
Post a Comment