जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ४२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड; आकर्षक पॅकेजसह करिअरची सुवर्णसंधी

एमबीए, बीबीए, कॉम्प्युटर व सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची लर्न फ्लू, एक्सेलआर, ग्लोबल बीआयएफएस आणि ग्लोबल व्ह्यू या आघाडीच्या कंपन्यांमध्ये निवड; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले अभिनंदन

जळगाव, ता. २० : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्याल्यातील    विद्यार्थ्यांनी जून आणि जुलै महिन्यात झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल ४२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. आकर्षक वेतन पॅकेजसह विद्यार्थ्यांना करिअरची नवी दिशा मिळाल्याने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच उद्योगाभिमुख प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य, सॉफ्ट स्किल्स, मुलाखत तंत्र आणि करिअर मार्गदर्शन दिले जाते. याच सर्वांगीण प्रशिक्षणाचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.

लर्न फ्लू या कंपनीने एमबीए व बीबीए विद्यार्थ्यांसाठी अकॅडमिक रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी ऑनलाइन भरती प्रक्रिया आयोजित केली होती. तीन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेनंतर १३ विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर (पीपीओ) देण्यात आली. या विद्यार्थ्यांना बंगळुरू येथे वार्षिक ८ लाखांपर्यंतचे आकर्षक वेतन पॅकेज मिळाले आहे.

एक्सेलआर या कंपनीने फुल स्टॅक डेव्हलपर पदासाठी १२ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणानंतर बंगळुरू येथे वार्षिक ९ लाखांचे वेतन पॅकेज मिळणार आहे.

तसेच ग्लोबल बीआयएफएस या कंपनीने बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (बीडीएम) आणि बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह (बीडीई) या पदांसाठी २ विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यांना नागपूर येथे वार्षिक ७ लाखांचे प्रारंभिक वेतन मिळणार आहे.

याशिवाय ग्लोबल व्ह्यू या कंपनीने सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील १५ विद्यार्थ्यांची स्टील डिटेलर पदासाठी निवड केली आहे. हे विद्यार्थी टेकला सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अमेरिकेतील ग्राहकांसाठी नाशिक येथून प्रकल्पांवर काम करणार असून त्यांना सुमारे ८ लाख वार्षिक प्रारंभिक वेतन मिळणार आहे.

या संपूर्ण प्लेसमेंट प्रक्रियेचे यशस्वी नियोजन ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या डीन प्रा. कौशकी सोंधी यांनी केले. तसेच संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल आणि शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अभिमानाची बाब : उद्योगविश्वाचा रायसोनीच्या विद्यार्थ्यांवरील वाढता विश्वास

"जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना केवळ पदवी प्रदान करण्यापेक्षा त्यांना उद्योगक्षेत्रासाठी सक्षम, कौशल्यसंपन्न आणि रोजगारक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारित शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, इंटर्नशिप, प्रकल्पाधारित शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

आज लर्न फ्लू, एक्सेलआर, ग्लोबल बीआयएफएस आणि ग्लोबल व्ह्यू यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्या आमच्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवून त्यांना आकर्षक करिअरच्या संधी देत आहेत. ही निवड केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पावती नसून प्राध्यापकांचे समर्पित मार्गदर्शन, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संस्थेच्या उद्योगाभिमुख शैक्षणिक धोरणाचे यश आहे.

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधनाच्या संधी, डिजिटल कौशल्ये आणि उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट भविष्यातही कटिबद्ध राहील. आमच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून संस्थेचे नाव अधिक उंचावावे, हीच अपेक्षा आहे."

प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

संचालिका, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट, जळगाव

 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण