जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ‘पीसीओएस व संतुलित आहारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
६५० विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी ; ‘हेल्दी माइंड • हेल्दी बॉडी • हेल्दी फ्युचर’— संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांचा संदेश
जळगाव, ता.
२८, : विद्यार्थिनींमध्ये
आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ
इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या रायसोनी रोटरॅक्ट क्लब यांच्या वतीने
पिंक हॅट क्लब व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या सहकार्याने ‘फ्री हेल्थ
चेक-अप कॅम्प’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील
अभियांत्रिकी व मॅनेजमेंट विभागाच्या सुमारे ६५० विद्यार्थिनींना आरोग्यविषयक
मार्गदर्शन देत त्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच.
रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित होत्या. तर
प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय,
जळगाव येथील
प्रसूतीतंत्र व स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. प्रतीक्षा राठोड व सहाय्यक
प्रा. डॉ. सोनाली फराटे उपस्थित होत्या.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी
विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक प्रगतीसोबतच शारीरिक व मानसिक
आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. ‘हेल्दी माइंड • हेल्दी
बॉडी • हेल्दी फ्युचर’ हा संदेश देत त्यांनी आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष न
करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे, संतुलित
आहार घेणे, नियमित
व्यायाम करणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन
भविष्यातही सातत्याने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर सहयोगी प्रा. डॉ. प्रतीक्षा राठोड व सहाय्यक प्रा. डॉ.
सोनाली फराटे यांनी ‘पीसीओएस अँड डायट’ या विषयावर विद्यार्थिनींना सविस्तर
मार्गदर्शन केले. त्यांनी वाढत्या वयातील हार्मोनल समस्या, स्थूलत्व आणि त्याचा आरोग्यावर होणारा
परिणाम तसेच मानसिक स्वास्थ्य या विषयांवर सविस्तर माहिती दिली. तसेच योग्य आहार,
नियमित व्यायाम,
संतुलित जीवनशैली आणि
वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमादरम्यान जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील
अभियांत्रिकी व मॅनेजमेंट विभागाच्या सुमारे ६५० विद्यार्थिनींना तज्ज्ञांकडून
आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच विद्यार्थिनींची मोफत आरोग्य तपासणी
करण्यात आली. आरोग्यविषयक विविध समस्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्याने
विद्यार्थिनींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाचे आयोजन रायसोनी रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगावचे अध्यक्ष
सात्विक दीक्षित, सचिव
विवेक भंगाळे व सचिव (ॲडमिन) हर्षाली सपकाळे यांच्या सहकार्याने करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मृदुला देशपांडे यांनी केले. तसेच प्रा. श्रिया
कोगटा यांनी उपक्रमाच्या नियोजन व आयोजनासाठी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका
बजावली. या उपक्रमासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ.
संजय शेखावत तसेच प्रा. कल्याणी नेवे, प्रा.
सरोज पाटील व प्रा. योगिता पाटील यांचेही सहकार्य
लाभले.
‘तुमचे आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती’ या संदेशातून विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि त्यांच्या निरोगी भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणारा हा आरोग्य तपासणी व जनजागृती उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला, अशी भावना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केली.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment