जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील गणरायाला भक्तिभावाने निरोप
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन सोहळा उत्साहात; पाच दिवसांच्या गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना नियोजन, नेतृत्व व संघभावनेची शिकवण
जळगाव,
ता. १८ : ‘गणपती
बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात जी.
एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधील गणरायाला पाचव्या दिवशी
भक्तिभावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पाच दिवसांच्या या गणेशोत्सवाची
सांगता उत्साह, आनंद आणि भावनिक वातावरणात झाली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी हा गणेशोत्सव केवळ
धार्मिक उत्सव न ठरता
नियोजन, नेतृत्व, संघभावना, जबाबदारी
आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा अनुभव देणारा उपक्रम ठरला.
गणेशोत्सवाच्या पाचही दिवसांतील विविध उपक्रमांमध्ये
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गणरायाची स्थापना, परिसराची सजावट, विविध धार्मिक व सांस्कृतिक
कार्यक्रमांचे नियोजन तसेच सायंकाळी खेळ व सांस्कृतिककार्यक्रमांचे आयोजन यामध्ये विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
प्रत्येक उपक्रमाची जबाबदारी स्वीकारत तो यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी
एकत्रितपणे मेहनत घेतली. त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना
नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे,
वेळेचे व्यवस्थापन, संघामध्ये समन्वय साधणे आणि दिलेली
जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
गणेशोत्सवातील प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांच्या सहभागाने अधिक
उत्साहपूर्ण झाला. धार्मिक वातावरणासोबतच विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. स्वतः
नियोजन करून, स्वतः जबाबदाऱ्या स्वीकारून आणि
एकमेकांच्या सहकार्याने उपक्रम पूर्ण करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी या
उत्सवाची विशेष शिकवण ठरली. त्यामुळे
पाच दिवसांचा हा गणेशोत्सव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही
महत्त्वपूर्ण ठरला.
गणेश विसर्जनापूर्वी महाविद्यालय परिसरात विधिवत आरती करण्यात
आली. यावेळी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अॅकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ठ
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गणेश गीतावर सादर केलेल्या
सुंदर आणि उत्स्फूर्त नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. भक्तिमय वातावरणात
विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराने कार्यक्रमात उत्साहाची भर पडली. आरतीनंतर
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. भक्तिगीत आणि जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही या सोहळ्यात सहभागी होत गणरायाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
मिरवणूक मेहरूण तलाव येथे पोहोचल्यानंतर तेथे आरती करण्यात
आली. यानंतर विधिवत पूजाविधी पार पाडत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पाच दिवस विद्यार्थ्यांच्या अथक
परिश्रमातून आणि सामूहिक सहभागातून साकारलेला गणेशोत्सव यशस्वीपणे पूर्ण झाला.
उत्सवाच्या माध्यमातून मिळालेली जबाबदारीची जाणीव, नेतृत्वगुण, सहकार्याची भावना आणि नियोजनाचा अनुभव
हीच विद्यार्थ्यांसाठी या गणेशोत्सवाची विशेष कमाई ठरली.
महाविद्यालयीन गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या स्टुडंट कौन्सिलच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध सहभागामुळे पाच दिवसांचा गणेशोत्सव भक्तिभाव, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने संस्मरणीय ठरला.


.jpeg)



Comments
Post a Comment