२१व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करा; ध्येय निश्चित करून उज्ज्वल भविष्य घडवा – संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

प्रेरणादायी मार्गदर्शनाने नवप्रवेशित प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला ‘आरंभ २०२६’मधून उत्साहात सुरुवात

जळगाव, ता. २०  : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची उत्साहपूर्ण सुरुवातआरंभ २०२६’ या इंडक्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली. नव्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन वातावरणाशी सुसंवादाने जुळवून घेणे, त्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची दिशा समजावून देणे तसेच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

‘आरंभ २०२६’च्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या=्युतनीक्रमाचा प्रमुख उद्देश आहे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल होत्या. यावेळी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात २१व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला व्यावहारिक कौशल्यांची जोड मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, आत्मविश्वास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाविद्यालयीन जीवनात मिळणाऱ्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा, नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा कायम ठेवावी आणि अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकत पुढे जावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी वाईट सवयींपासून दूर राहून आपल्या वेळेचा योग्य उपयोग करावा आणि जीवनाला स्पष्ट, सकारात्मक व अर्थपूर्ण ध्येय द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. ‘आजची मेहनत ही उद्याच्या यशाची भक्कम पायाभरणी असते’, या भावनेने विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाकडे पाहावे, असे सांगत त्यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, उत्साह आणि नव्या संधींचा स्वीकार करण्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

आरंभ २०२६’च्या दुसऱ्या दिवशी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२०, अभ्यासक्रमाची रचना आणि शैक्षणिक संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थेची स्वायत्तता विद्यार्थ्यांना शैक्षणिक लवचिकता, नाविन्यपूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि सर्वांगीण शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. बदलत्या अभियांत्रिकी शिक्षणव्यवस्थेचा वेध घेत विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

तिसऱ्या दिवशी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक उपक्रम, विविध विद्यार्थी क्लब तसेच सहशैक्षणिक व अतिरिक्त उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी क्लब आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे नेतृत्व, संघभावना, संवादकौशल्य, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारखी कौशल्ये विकसित होतात, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयातील उपलब्ध विविध संधींचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि पहिल्याच वर्षापासून शैक्षणिक तसेच सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सुवर्णा सराफ यांनी जबाबदारी सांभाळली. 

‘आरंभ २०२६’च्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य, संस्कार आणि आत्मविश्वासाच्या बळावर नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची भक्कम पायाभरणी होत असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी योग्य दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे जी. एच. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव