जी. एच. रायसोनी महाविद्यालयात नुकतेच पीएचडी पूर्ण केलेल्या सहा प्राध्यापकांचा विशेष सत्कार; ज्ञान, संशोधन आणि गुणवत्तेचा गौरव
नामांकित आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते प्राध्यापकांचा सन्मान; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे संशोधन संस्कृतीला चालना देण्याचे आवाहन
जळगाव, ता. १३ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड
मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील सहा
प्राध्यापकांनी विविध विषयांमध्ये नुकतेच यशस्वीरित्या पीएचडी पदवी संपादन करून
महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील लौकिकात आणखी भर घातली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय व अभिमानास्पद शैक्षणिक कामगिरीबद्दल नामांकित आयटीतज्ज्ञ
डॉ. दीपक शिकारपूर, जी.
एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल आणि अकॅडमिक डीन
प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते त्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी
संशोधन ही उच्च शिक्षणाची खरी ओळख असून उत्कृष्ट संशोधनामुळे शिक्षणाची गुणवत्ता
उंचावते, विद्यार्थ्यांना
अद्ययावत ज्ञान मिळते आणि समाजोपयोगी नवकल्पनांना चालना मिळते, असे सांगितले. महाविद्यालयातील
प्राध्यापक सातत्याने संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून सहा
प्राध्यापकांनी एकाच कालावधीत पीएचडी पूर्ण करणे ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद
बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अधिकाधिक प्राध्यापकांनी संशोधनामध्ये
योगदान देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे,
असे आवाहनही त्यांनी
केले.
यावेळी उपस्थित असलेल्या नामांकित आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक
शिकारपूर यांनीही संशोधन, नवतंत्रज्ञान
आणि उद्योगाभिमुख शिक्षण यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत संशोधनामुळे
विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचारसरणी विकसित होते, असे सांगितले. जागतिक स्तरावरील
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य
देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पीएचडी पूर्ण केलेल्या प्राध्यापकांमध्ये व्यवस्थापन
विभागाच्या डॉ. प्रतिक्षा जैन (व्यवस्थापन विभाग) यांनी "अन अॅनालिसिस ऑफ
इन्व्हेस्टमेंट बिहेविअर अमंग वर्किंग वूमेन अक्रॉस नॉर्थ महाराष्ट्र रिजन"
या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून पीएचडी पूर्ण केली.
डॉ. रोहित साळुंखे (व्यवस्थापन विभाग) यांनी "अ स्टडी ऑफ
इमर्जिंग डिजिटल मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस विथ स्पेशल
रेफरन्स टू आयटी फर्म्स बेस्ड इन पुणे" या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठ, पुणे
येथून पीएचडी पूर्ण केली.
डॉ. शरयू बोंडे (संगणकशास्त्र विभाग) यांनी "प्रेडिक्टिंग
डेटा मायनिंग फॉर अॅनालायझिंग फॅक्टर्स अफेक्टिंग डिग्रेडेशन इन इंजिनिअरिंग
अॅडमिशन्स" या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,
जळगाव येथून पीएचडी
पूर्ण केली.
डॉ. अर्जुन जाधव (संगणकशास्त्र विभाग) यांनी "डिझाईन अ
सिस्टिम फॉर डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ बनाना लीफ डिसीज युजिंग डीप
लर्निंग" या विषयावर सेज युनिव्हर्सिटी, इंदूर येथून पीएचडी पूर्ण केली.
डॉ. प्रमोद गुप्ता (ई अँड टीसी विभाग) यांनी
"इन्व्हेस्टिगेशन ऑफ कॉम्पॅक्ट लो प्रोफाइल रेक्टँग्युलर डाय-इलेक्ट्रिक
रेझोनेटर अँटेना फॉर वाइड बँड अॅप्लिकेशन्स" या विषयावर पंडित द्वारकाप्रसाद
मिश्रा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग
(आयआयआयटीडीएम), जबलपूर,
मध्यप्रदेश येथून
पीएचडी पूर्ण केली.
डॉ. मुकुंद पाटील (यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग) यांनी
"अॅडव्हान्स्ड पायोनियरिंग रिसर्च इन कॉम्प्युटेशनल मटेरियल इंजिनिअरिंग,
फोकसिंग ऑन फंक्शनली
ग्रेडेड मटेरियल्स, कॉम्पोझिट्स
अँड मॅग्नेटोस्ट्रिक्टिव्ह सिस्टिम्स" या विषयावर युनिव्हर्सिटी ऑफ
साउथॅम्प्टन, युनायटेड
किंग्डम येथून पीएचडी पूर्ण केली.
महाविद्यालयातील सहा प्राध्यापकांनी विविध विद्यापीठांतून
संशोधनाधारित पीएचडी पदवी संपादन करून संस्थेच्या संशोधन परंपरेला नवी उंची
प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक
गुणवत्ता, संशोधन
क्षमता तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा अधिक दृढ झाली आहे.
ही कामगिरी संपूर्ण जी. एच. रायसोनी परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, संशोधनाधिष्ठित शिक्षणाच्या दिशेने
संस्थेची भक्कम वाटचाल अधोरेखित करणारी आहे, अशी भावना जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पीएचडी प्राप्त प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

.jpg)
.jpg)






Comments
Post a Comment