विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “करिअर मार्गदर्शन केंद्र” सुरू
संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन; बदलत्या रोजगारविश्वाशी सुसंगत करिअर नियोजनासाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन
जळगाव, ता. २ : विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यापेक्षा स्वतःच्या क्षमता, आवडीनिवडी आणि बदलत्या उद्योगविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन योग्य करिअरची निवड करावी, या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये अत्याधुनिक करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी अॅडमिशन डीन प्रा. रफिक शेख, प्रा. तन्मय भाले, प्रा. योगेश वंजारी, प्रा. अमोल जोशी, प्रा. वसिम पटेल, प्रा. डॉ. सौरभ नाईक यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच योग्य करिअर नियोजन, रोजगाराच्या बदलत्या संधी, कौशल्यविकास आणि उद्योगजगताच्या
अपेक्षांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या
दूरदृष्टीतून हे अत्याधुनिक करिअर मार्गदर्शन केंद्र विकसित करण्यात आले आहे. हे
केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केंद्र
ठरणार आहे.
या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, आवड, व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य आणि विश्लेषणात्मक विचारशक्तीचे मूल्यमापन करण्यात येईल. अनुभवी ॲप्टिट्यूड ट्रेनर्स, सब्जेक्ट एक्सपर्ट्स, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि करिअर मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्या क्षमतांनुसार योग्य करिअरची दिशा निश्चित करतील.
आजही अनेक विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांची निवड करतात; मात्र या केंद्राच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना सध्याच्या जागतिक रोजगार बाजारपेठेचा अभ्यास करून आर्टिफिशियल
इंटेलिजन्स (एआय),
मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), इलेक्ट्रिक व्हेईकल्स (ईव्ही), सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस ॲनालिटिक्स, फिनटेक, यूआय/यूएक्स
डिझाईन, आंत्रप्रेन्युअरशिप आणि स्टार्टअप इकोसिस्टम
यांसारख्या भविष्यात मोठ्या संधी असलेल्या क्षेत्रांची माहिती दिली जाणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि उद्योगस्नेही अभ्यासक्रमांची निवड करणे
अधिक सोपे होणार आहे.
या करिअर मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये करिअर इंटरेस्ट आणि व्यक्तिमत्त्व चाचण्या, ॲप्टिट्यूड व लॉजिकल रिझनिंग प्रशिक्षण, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, रेझ्युमे रायटिंग, लिंक्डइन प्रोफाइल डेव्हलपमेंट, मॉक इंटरव्ह्यूज, ग्रुप डिस्कशन, कम्युनिकेशन स्किल्स व सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मार्गदर्शन, हायर एज्युकेशन, इंटर्नशिप, इंडस्ट्रियल ट्रेनिंग, प्लेसमेंट तयारी, आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, स्टार्टअप मेंटरिंग, विद्यार्थी-पालक संयुक्त समुपदेशन, रोजगार बाजारातील नव्या संधींची माहिती तसेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र करिअर रोडमॅप तयार करण्याचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांची अचूक ओळख होऊन योग्य करिअरची निवड करणे, कौशल्यविकास करणे आणि जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला सक्षम बनविणे शक्य होणार आहे.
त्यानी पुढे नमूद केले कि, "करिअर
मार्गदर्शन केंद्र हे केवळ मार्गदर्शन करणारे कार्यालय नसून विद्यार्थ्यांच्या
स्वप्नांना दिशा देणारे प्रेरणास्थान ठरेल. जळगाव शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना
एकाच छताखाली आधुनिक करिअर मार्गदर्शन, तज्ज्ञांचे वैयक्तिक समुपदेशन, कौशल्यविकास प्रशिक्षण आणि बदलत्या
उद्योगविश्वाची माहिती उपलब्ध करून देण्याचा या केंद्रामागील उद्देश आहे. येथे
प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता, आवड
आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्याला योग्य क्षेत्राची निवड करण्यासाठी
तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. उद्योगविश्वाला आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास
करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी सक्षम
बनविणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांनी सतत नवीन तंत्रज्ञान
आत्मसात करावे, नवोपक्रमशील
विचार विकसित करावा, आत्मविश्वास
वाढवावा आणि प्रत्येक संधीचे सोनं करावे. योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन
यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. या करिअर मार्गदर्शन केंद्राच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा, आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वास मिळेल,
असा मला ठाम विश्वास
आहे."
यावेळी जी. एच. रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील
रायसोनी यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक
आणि करिअरविषयक सर्व शंकांचे निरसन करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी हे करिअर
मार्गदर्शन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल. हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या
क्षमतांनुसार योग्य करिअर निवडण्यास, आधुनिक
कौशल्ये आत्मसात करण्यास आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यास या केंद्राचा निश्चितच मोठा
लाभ होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी करिअर मार्गदर्शन केंद्राची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करत हे केंद्र त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला आणि उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.





Comments
Post a Comment