“स्मार्ट एज्युकेशन ते ऑलिम्पिक लेव्हल स्विमिंग पूल; जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल घडवत आहे उद्याचे फ्युचर रेडी विद्यार्थी”

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू | अनुभवी शिक्षकवर्ग, इंडिव्हिज्युअल अटेन्शन, ग्लोबल लँग्वेज लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, नीट/जेईई फाउंडेशन, कम्युनिकेशन स्किल्स, व्हॅल्यू एज्युकेशन व परफॉर्मिंग आर्ट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फ्युचर रेडी बनविण्यावर विशेष भर

जळगाव, ता. १७ : आजच्या वेगवान, टेक्नॉलॉजीप्रधान आणि अत्यंत स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण देणे पुरेसे राहिलेले नाही. बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेनुसार विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम, आत्मविश्वासपूर्ण, स्किलफुल आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करणे ही काळाची गरज बनली आहे. याच दूरदृष्टीपूर्ण आणि आधुनिक शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्लेग्रुप ते इयत्ता बारावीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामुळे पालकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

अ ट्रस्टेड लेगसी इन एज्युकेशन – फ्रॉम केजी टू पीजी या व्हिजनसह कार्यरत असलेली शाळा विद्यार्थ्यांना केवळ अकॅडमिक एक्सलन्ससाठी नव्हे, तर भविष्यातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले नॉलेज, स्किल्स, कॉन्फिडन्स, लीडरशिप आणि व्हॅल्यूज विकसित करण्यावर विशेष भर देत आहे. त्यामुळेच आज गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि फ्युचर रेडी एज्युकेशनचा विचार करणाऱ्या पालकांसाठी ही शाळा विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.

सीबीएसई अभ्यासक्रमासह क्वालिटी एज्युकेशन व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी
शाळेमध्ये सीबीएसई आधारित कॉन्सेप्ट बेस्ड, अॅक्टिव्हिटी बेस्ड आणि स्किल ओरिएंटेड एज्युकेशन दिले जाते. विशेष म्हणजे, भारत सरकारच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत इंटरडिसिप्लिनरी, एक्सपिरिएन्शियल आणि स्टुडंट सेंट्रिक लर्निंग पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. केवळ पुस्तकाधारित शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन आणि लाइफ स्किल्स विकसित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.

अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवडीनिवडी आणि शिकण्याच्या गतीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन करतात. इंडिव्हिज्युअल अटेन्शन पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीवर बारकाईने लक्ष दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या अकॅडमिक परफॉर्मन्स, व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठीची तयारी अधिक सक्षम होत असल्याचे दिसून येते.

सेफ, सिक्युअर आणि पालकांसाठी विश्वासार्ह कॅम्पस

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळेचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली सेफ आणि सिक्युअर कॅम्पस म्हणून विकसित करण्यात आला आहे. सुरक्षित ट्रान्सपोर्ट सुविधा, प्रशिक्षित स्टाफ आणि शिस्तबद्ध वातावरणामुळे पालकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. तसेच पालकांच्या सोयीचा विचार करून फ्लेक्सिबल फी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे. 

स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल लर्निंगमुळे शिक्षण अधिक प्रभावी

विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक आकर्षक आणि सहज समजावे यासाठी शाळेमध्ये स्मार्ट क्लासरूम, इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड, ऑडिओ-व्हिज्युअल लर्निंग आणि डिजिटल टीचिंग टूल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विषयांचे प्रॅक्टिकल डेमो, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढविण्यावर भर दिला जातो.

नीट/जेईई फाउंडेशनद्वारे भविष्यातील करिअरसाठी तयारी

विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने शाळेमध्ये नीट/जेईई फाउंडेशन प्रोग्राम राबविण्यात येतो. सायन्स आणि मॅथेमॅटिक्स विषयांचा मजबूत पाया तयार करून विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग आणि रिसर्च क्षेत्रातील करिअरसाठी सक्षम बनविले जाते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि इनोव्हेशन आधारित फ्युचर रेडी एज्युकेशन

बदलत्या डिजिटल युगाचा विचार करून शाळेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), रोबोटिक्स, कोडिंग, स्टेम एज्युकेशन आणि इनोव्हेशन बेस्ड लर्निंग यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन स्किल्स विकसित करण्यासाठी प्रॅक्टिकल आणि एक्सपिरिएन्शियल लर्निंगवर विशेष भर दिला जातो.

फ्रेंच, जर्मन आणि जपानी भाषा शिक्षण; विद्यार्थ्यांना ग्लोबल प्लॅटफॉर्मची तयारी

आजच्या ग्लोबल युगात मल्टी लँग्वेज स्किल्स अत्यंत महत्त्वाच्या ठरत असल्याने विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मन आणि जपानी भाषा शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल कम्युनिकेशन, उच्च शिक्षण आणि भविष्यातील करिअर संधींसाठी मोठा फायदा होत आहे.

ऑलिम्पिक लेव्हल स्विमिंग पूल; प्रोफेशनल ट्रेनिंगची सुविधा


विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला चालना देण्यासाठी शाळेमध्ये ऑलिम्पिक लेव्हल स्विमिंग पूल उपलब्ध असून, त्यामध्ये प्रशिक्षित कोचमार्फत नियमित स्विमिंग ट्रेनिंग दिले जाते. लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना प्रोफेशनल पद्धतीने स्विमिंगचे प्रशिक्षण दिले जात असल्याने त्यांच्यामध्ये फिटनेस, डिसिप्लिन, कॉन्फिडन्स आणि स्पोर्ट्समनशिप विकसित होत आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यावरही विशेष भर दिला जात आहे.

इंग्लिश कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि लाइफ स्किल्सवर विशेष भर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी इंग्लिश कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लीडरशिप ट्रेनिंग, लाइफ स्किल्स आणि व्हॅल्यू एज्युकेशन यांसारखे उपक्रम नियमितपणे घेतले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशन स्किल्स, स्टेज कॉन्फिडन्स, डिसिजन मेकिंग आणि लीडरशिप क्वालिटीज विकसित होत आहेत.

स्पोर्ट्स, योगा, परफॉर्मिंग आर्ट्स आणि कलागुणांना प्रोत्साहन


शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा यासाठी इंडोर-आउटडोर स्पोर्ट्स, योगा, म्युझिक, डान्स, ड्रामा, आर्ट अँड क्राफ्ट आणि कल्चरल अॅक्टिव्हिटीज यांना विशेष महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी वर्षभर विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यश, नवोपक्रम आणि सर्वांगीण विकासाची यशस्वी परंपरा

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणातच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सीबीएसई दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा, विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक यशामुळे शाळेने गुणवत्तेचा वेगळा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्याआंतरशालेय हॅकाथॉन मध्ये कोडिंग, अ‍ॅप डेव्हलपमेंट आणि एआय चॅटबॉट सारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवत नावीन्यपूर्ण विचारसरणीचे दर्शन घडविले.

यासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी स्कूलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑलिम्पिक लेव्हल स्विमिंग पूल व प्रशिक्षित कोचिंगमुळे विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावत चमकदार यश मिळविले आहे. शाळेच्या परिसरात जिल्हास्तरीय एक्वाटिक चॅम्पियनशिपचे आयोजन करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी तयार करण्याचे कार्यही केले जात आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासावर भर देतमेंटल हेल्थ अवेअरनेस, ‘गुड टच-बॅड टच यांसारख्या मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण विकसित व्हावे यासाठी पोलीस स्टेशन, जेली फॅक्टरी, इंडस्ट्रियल व एज्युकेशनल व्हिजिट्स आयोजित करून कुतूहल वाढविले जाते.

शिक्षणासोबत संस्कार आणि आनंदी शिक्षणाची सांगड घालत ग्रॅज्युएशन सेरेमनी, नवरात्र उत्सव, दहीहंडी, आजी-आजोबा दिवस, फूड फेस्टिवल, सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे, शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व टेक्नॉलॉजी आधारित अध्यापन पद्धतीची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरीलमोस्ट टेक्निकल कंपेटेंट टीचर्सपुरस्काराने शाळेला गौरविण्यात आले आहे.

तसेच विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्शन युथ फेस्टिव्हलमध्ये विजेतेपद मिळवत जागतिक स्तरावरही स्कूलचे नाव उंचावले असून, यामुळे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांना फ्युचर रेडी, कॉन्फिडंट आणि ग्लोबली कॉम्पिटंट सिटिझन्स बनविणारे सक्षम व्यासपीठ म्हणून उदयास येत असल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.

पालकांसाठी सुवर्णसंधी!

उत्कृष्ट अकॅडमिक रिझल्ट्स, आधुनिक एज्युकेशन सिस्टीम, जागतिक दर्जाच्या सुविधा, ऑलिम्पिक लेव्हल स्विमिंग पूल, अनुभवी फॅकल्टी, संस्कारक्षम वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंट वर दिला जाणारा भर यांमुळे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया घालणारी अग्रगण्य शैक्षणिक संस्था ठरत आहे.

अकॅडमिक एक्सलन्स + स्मार्ट लर्निंग + होलिस्टिक डेव्हलपमेंट + स्पोर्ट्स एक्सलन्स + फ्युचर रेडी एज्युकेशन या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्याचे यशस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य शाळेकडून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल, सुरक्षित आणि यशस्वी भविष्यासाठी पालकांनी वेळ न दवडता जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शाळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण