रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापक रोहित साळुंखे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

जळगाव : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयातील बिझनेस मॅनेजमेंट विभागातील प्राध्यापक डॉ. रोहित साळुंखे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत व्यवस्थापन विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. साळुंखे यांनी “पुणे येथील आयटी कंपन्यांच्या विशेष संदर्भासह इमर्जिंग डिजिटल मार्केटिंग आणि व्यवसाय विकास पद्धतींचा अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. हे संशोधन डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, लोहेगाव, पुणे येथील संशोधन मार्गदर्शक डॉ. चेतन एकनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.

या संशोधन कार्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

डॉ. रोहित साळुंखे यांनी डिजिटल मार्केटिंग, बिझनेस अॅनालिटिक्स आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव