जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पुन्हा एकदा रंगणार ‘ओपन पेंटिंग स्पर्धा’
मागील आठवड्यातील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; यावेळी ‘ट्रेडिशनल आर्ट फ्युजन’ या नव्या विषयावर संधी — जे वंचित राहिले त्यांच्यासाठी खास पुनश्च संधी
जळगाव, ता.०६
: जी. एच. रायसोनी एज्युकेशनतर्फे रविवार,
१० मे २०२६ रोजी
सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘फ्युजन थीम-आधारित ओपन पेंटिंग स्पर्धा’चे आयोजन
करण्यात आले आहे. ही स्पर्धा जळगाव येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पार पडणार आहे.
मागील आठवड्यात ‘नेचर अराउंड अस’ आणि ‘द रूट्स ऑफ ट्रेडिशन’ या
विषयांवर आधारित स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली होती. त्या स्पर्धेला
विद्यार्थ्यांचा व कला प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याच यशस्वी परंपरेत
यावेळी पुन्हा एकदा वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात
येत आहे. त्यामुळे मागील स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेल्या इच्छुकांसाठी ही एक
सुवर्णसंधी ठरणार आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी स्पर्धकांना पारंपरिक
चित्रकला प्रकार जसे की फड (Phad), वारली (Warli), मधुबनी (Madhubani) इत्यादी कला प्रकारांचा वापर करून त्यात
आधुनिक (Contemporary) शैलीची
सांगड घालत स्वतंत्र ‘फ्युजन’ स्वरूपातील चित्र साकारायचे आहे. पारंपरिकतेला
आधुनिकतेची जोड देत सर्जनशीलतेला नवे आयाम देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
स्पर्धेत तीन वयोगट ठेवण्यात आले असून ८ ते १३ वर्षे, १३ ते २१ वर्षे आणि २१ वर्षांवरील
स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक
रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून प्रोत्साहनपर पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रति सहभागी ₹५९ इतकी नाममात्र नोंदणी फी ठेवण्यात
आली आहे. ड्रॉइंग शीट आयोजकांकडून उपलब्ध करून दिली जाईल, तर स्पर्धकांनी स्वतःचे रंग व साहित्य
आणणे आवश्यक आहे. सर्व चित्रे स्पर्धास्थळीच तयार करणे बंधनकारक असून परीक्षकांकडून
मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक कलेबद्दलची जाण
वाढण्यासोबतच आधुनिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. तसेच नवोदित
कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमासाठी
डॉ. अविनाश डी. काटे (डीन व प्राध्यापक) व डॉ. मृणालिनी एस. नाईक (प्रोजेक्ट
डायरेक्टर) मार्गदर्शन करत आहेत.
स्पर्धेत सहभागी
होण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक
माहितीसाठी प्रा. अक्षय पाटील (मो. ८००७५७४३७३) व डॉ. सौरभ नाईक (मो. ९४२१७१५१३३) यांच्याशी
संपर्क साधावा.

Comments
Post a Comment