जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रंगली ‘ओपन पेंटिंग स्पर्धा’

नेचर’ आणि ‘ट्रेडिशन’च्या संकल्पनांवर एकाच छताखाली असंख्य विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक कलाकृती; मान्यवरांचे मार्गदर्शन, विजेत्यांना ३७,००० ची रोख पारितोषिके

जळगाव, ता. ३ मे : जी. एच. रायसोनी एज्युकेशनतर्फे आयोजित ‘थीम-आधारित ओपन पेंटिंग स्पर्धा’ रविवारी, ३ मे  रोजी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात उत्साहात पार पडली. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

स्पर्धेत ‘नेचर अराउंड अस’ आणि ‘द रूट्स ऑफ ट्रेडिशन’ या विषयांवर आधारित चित्रकृती सादर करण्यात आल्या. सहभागी स्पर्धकांनी कल्पकता, विचारांची मांडणी आणि स्वतंत्र अभिव्यक्तीच्या माध्यमातून विविध आशयपूर्ण चित्रे साकारली. ही स्पर्धा पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला वाव देणारी ठरली.

बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात इतिहास अभ्यासक व पुरातत्त्व तज्ञ डॉ. भुजंग रामराव बोबडे तसेच डॉ. संजीव हुजूरबाजार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय शेखावत होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्त्व, सर्जनशीलतेची गरज आणि कला ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग, संस्कृती आणि परंपरा यांचे बारकावे कलाकृतीतून व्यक्त करण्याचे मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रकला शिक्षक दत्तात्रय गंधे व मोहन गोमसे यांनी काम पाहिले. त्यांनी ‘नेचर अराउंड अस’ व ‘द रूट्स ऑफ ट्रेडिशन’ या विषयांवर आधारित चित्रांचे परीक्षण व मूल्यमापन करत विद्यार्थ्यांना रचना, रंगसंगती, विषय मांडणी आणि कल्पनाशक्ती याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अविनाश डी. काटे (डीन व प्राध्यापक, सॅमवेद स्कूल ऑफ आर्ट, म्युझिक, व्हिज्युअलायझेशन, एंटरटेनमेंट अँड डिझाइन, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे), डॉ. मृणालिनी एस. नाईक (प्रोजेक्ट डायरेक्टर) व कृणाल महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढीस लागण्यासोबतच नवोदित कलाकारांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, तसेच ही स्पर्धा पुढील विविध कला उपक्रमांच्या मालिकेची यशस्वी सुरुवात ठरली आहे.

स्पर्धेत ८ ते १३, १३ ते २१ आणि २१ वर्षांवरील अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३००० ते ७००० असे एकूण ३७००० पर्यंत रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच प्रत्येक गटात प्रोत्साहनपर पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सर्व आयोजक, समन्वयक व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

स्पर्धेत चमकले हे विजेते”

प्रथम गट (८ ते १३ वर्षे)
प्रथम : समृद्धी हर्षल भंगाळे, द्वितीय : अनघा श्रीकृष्ण वाघ, तृतीय : प्रतिक्षा नरेंद्र चौधरी,
उत्तेजनार्थ : कार्तिक श्रीराम चौधरी, आरोही सचिन राठोड.

द्वितीय गट (१३ ते २१ वर्षे)
प्रथम : तेजस भीकन पवार, द्वितीय : हेमन दत्तात्रेय फुलपगारे, तृतीय : दर्शन संजय सोनार,
उत्तेजनार्थ : सोनाली राजेश धूत, भाग्यश्री एस. राजपूत.

तृतीय गट (२१ वर्षांवरील)
प्रथम : समय अजय चौधरी, द्वितीय : वासू पाटील, तृतीय : युनूस शेख रफिक,
उत्तेजनार्थ : वंदना दायमा, देवेंद्रप्रकाश बर्डे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण