जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्यांचा उत्साहात “ग्रॅज्युएशन डे” साजरा

सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव; पालकांच्या उपस्थितीत रंगला आनंदसोहळा

जळगाव, ता. १६ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी “ग्रॅज्युएशन डे” उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्वप्राथमिक शिक्षण पूर्ण करून प्राथमिक वर्गात प्रवेश करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा विशेष पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्वागत नृत्याने कार्यक्रमाला रंगत आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिन्सी रावत यांनी केले. कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सीनियर केजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे दर्शन घडवणारे सादरीकरण (PPT Presentation) सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वर्षभरातील विविध उपक्रम, शैक्षणिक प्रगती आणि आनंददायी क्षणांचा आढावा यामधून मांडला.

या प्रसंगी सीनियर केजीमधील विवान कोच्छर आणि नीवा धूत या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या निरागस भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून अंकिता लोढा, तुषार विसावे, जान्हवी पाटील आणि डॉ. एकता अग्रवाल यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेल्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांना गाऊन व कॅप परिधान करून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर चिमुकल्यांनी आनंद व्यक्त करत उत्साहाने ‘कॅप टॉस’ करून आनंदोत्सव साजरा केला.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल शाळेच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण