शिवजयंतीची चाहूल लागताच जी. एच. रायसोनी पब्लीक स्कूलमध्ये ऐतिहासिक जल्लोष

किल्ले बनवा स्पर्धा, शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतिहास व डिफेन्स क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वराज्याची प्रेरणा जागृत ; विद्यार्थ्यांच्या टॅलेंटचा भव्य आणि प्रभावी आविष्कार

जळगाव, ता. १२ :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे शिवजयंतीच्या अनुषंगाने विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “लेगसी ऑफ स्वराज्य – व्हिजन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज” या थीमवर आधारित या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान व राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यात आली.

शिवजयंती निमित्त आयोजित या प्रोग्राममध्ये किल्ले बनवा स्पर्धा, शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ऐतिहासिक सादरीकरणांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सुमारे १०० किल्ल्यांची आकर्षक मॉडेल्स तयार करून शिवकालीन वैभव जिवंत केले. तसेच जन्मापासून राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा शिवचरित्र प्रवास प्रभावी परफॉर्मन्सद्वारे सादर करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून मु. जे. महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विभागप्रमुख प्रा. जुगल किशोर दुबे व संरक्षण अध्ययन विभागाचे प्रा. लक्ष्मण वाघ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गड-किल्ल्यांचे अभ्यासक श्री. गणेश पाटील, श्री. वैभव कोळी, आर. जे. समृद्धी आणि दूरचित्रवाणी अभिनेते श्री. अक्षय नेहे यांची उपस्थिती लाभली. श्री. गणेश पाटील यांनी  विद्यार्थ्यांना व पालकांना शिवकालीन इतिहास, किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याच्या विचारांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. किल्ला निर्मिती स्पर्धेत रायसोनी स्कूलमधील विद्यार्थ्यांबरोबरच शहरातील इतर स्कूलमधील विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्पर्धेला व्यापक स्वरूप दिले

संपूर्ण कार्यक्रम स्कूलच्या प्रिन्सिपल श्रीमती क्रिस्टाबेल परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांचे स्कूलच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचेही विशेष अभिनंदन केले.

शिवजयंतीला काही दिवस शिल्लक असतानाच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे संपूर्ण स्कूलमध्ये स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा जागृत झाली असून उत्साहपूर्ण आणि शिवमय वातावरण निर्माण झाले.

 

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे

सोलो गटात प्री-प्रायमरी विभागातून मानवी अग्रवाल हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रायमरी विभागातून युग सुराणा तर सेकंडरी विभागातून रोनक महाजन यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिक मिळवले.

ग्रुप गटात प्री-प्रायमरी विभागातून अनन्या भन्साळी, प्रणवी अग्रवाल आणि अश्वी अग्रवाल यांनी यश संपादन केले. तसेच प्रायमरी गटात कौस्तुभ साळुंके आणि हृदय सोनवणे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पारितोषिक प्राप्त केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण