जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रायसोनी पब्लिक स्कूलचे घवघवीत यश
जळगाव , ता. ९ : जळगाव शहरात नुकत्याच
पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे यंग मोडो चॅम्पियनशिप २०२५–२६ मध्ये जी. एच.
रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत स्कूलचे नाव उज्ज्वल
केले. स्पर्धेत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पदके पटकावल्यामुळे जी. एच.
रायसोनी पब्लिक स्कूललाही विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत हुसेन जमाली, आरव कोगटा, नंदिनी सूर्यवंशी आणि जेनील गाला यांनी
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदके (गोल्ड मेडल) पटकावली. तर मोक्तीका, रिदम चोरडिया, विहान मुथा, हुसेन जमाली, गार्गी ठाकरे आणि विशान मुथा यांनी
दमदार कामगिरी करत रौप्यपदके (सिल्व्हर मेडल) मिळवली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूलच्या मुख्याध्यापिका
क्रिस्टाबेल परेरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय
यशाबद्दल संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने कराटे स्पर्धेत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
Comments
Post a Comment