जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या बीसीए–एमसीए विद्यार्थ्यांचा जळगाव विमानतळावर अभ्यासदौरा

विद्यार्थ्यांना विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था, आयटी प्रणाली व तांत्रिक प्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. ०७ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनतर्फे कुसुंबा, जळगाव विमानतळ येथे शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त असा औद्योगिक अभ्यासदौरा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. या अभ्यासदौऱ्यात बीसीए व एमसीए विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या औद्योगिक भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा अनुभव देणे हा होता. अभ्यासदौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी विमानतळावरील अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, माहिती तंत्रज्ञानाचा (IT) वापर, विविध सॉफ्टवेअर प्रणाली, तसेच विमान वाहतुकीशी संबंधित तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया यांचे सखोल अध्ययन केले. प्रत्यक्ष कार्यक्षेत्र पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पना अधिक स्पष्टपणे समजल्या व व्यावहारिक ज्ञानात भर पडली.

या उपक्रमाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. अशा औद्योगिक अभ्यासदौर्‍यांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात शिकविलेल्या सैद्धांतिक संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग कसा होतो, हे समजण्यास मदत होते. तसेच उद्योगजगतातील कार्यपद्धती, तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर व व्यावसायिक शिस्त यांची ओळख विद्यार्थ्यांना मिळते, ज्यामुळे त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन अधिक व्यापक व परिपक्व होतो. भविष्यातील करिअर घडणीच्या दृष्टीने असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासही ते उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.

हा अभ्यासदौरा बीसीए व एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. प्रा. शुभम अडवाल व प्रा. तेजस्विनी वारके यांनी या अभ्यासदौऱ्याचे प्रभावी नियोजन करत विधार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.

या अभ्यासदौर्‍याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनीही विभागप्रमुख, समन्वयक तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत, भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याचे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण