जी. एच. रायसोनी महाविद्यालयात नवनियुक्त “स्टुडंट कौन्सिल २०२५–२०२६” चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

विद्यार्थी नेतृत्व व सर्वांगीण विकासासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

जळगाव, ता. ५ : विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वक्तृत्व कौशल्य, संघभावना व जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी तसेच त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधला जावा या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव (ऑटोनॉमस) येथे “स्टुडंट कौन्सिल २०२५–२०२६” चा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयीन शैक्षणिक, सहशैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्यामध्ये स्टुडंट कौन्सिलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

या कार्यक्रमाला जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर सर्व शाखांमधून निवड झालेल्या नवनियुक्त स्टुडंट कौन्सिल सदस्यांना त्यांच्या पदानुसार सॅश व बॅज प्रदान करून अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष भाग्येश चौधरी व उपाध्यक्ष लोकेश तलरेजा यांनी आगामी शैक्षणिक, तांत्रिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा थोडक्यात आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून मांडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्टुडंट कौन्सिल ही केवळ पदांची रचना नसून ती विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, निर्णयक्षमता व जबाबदारीची भावना विकसित करणारी प्रभावी प्रक्रिया आहे. संघटन कौशल्य, संवादकला, वेळेचे नियोजन व टीमवर्क या गुणांचा विकास या माध्यमातून घडतो.”

त्यानी पुढे नमूद केले की, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारित व अनुभवात्मक शिक्षणावर भर देण्यात येत असून ‘थिअरी’सोबत ‘प्रॅक्टिकल नॉलेज’ आवश्यक आहे. म्हणूनच रायसोनी महाविद्यालयात विविध शैक्षणिक, तांत्रिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. स्टुडंट कौन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा ३६० अंश सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.” शेवटी त्यांनी सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी उपक्रम नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या राबवण्याचे आवाहन केले.

यावेळी अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी देखील संक्षिप्त मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थीदशेत नेतृत्व, संघभावना व आत्मविश्वास विकसित करणे अत्यंत आवश्यक असून स्टुडंट कौन्सिलसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मा. श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक करून नवनियुक्त स्टुडंट कौन्सिलला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया भंगाळे व निधी वाजपेयी या विद्यार्थिनीनी   केले तर आभार प्रदर्शन डीन स्टुडंट अ‍ॅक्टिव्हिटी प्रा. वसीम पटेल यांनी केले. या पदग्रहण सोहळ्यामुळे महाविद्यालयीन वातावरणात उत्साह व नवचैतन्य निर्माण झाले आहे.

 

नवनियुक्त स्टुडंट कौन्सिल (२०२५–२०२६) ची कार्यकारिणी व विविध समित्यांतील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत :

अध्यक्ष म्हणून भाग्येश चौधरी (AIML, तृतीय वर्ष), उपाध्यक्ष म्हणून लोकेश तळरेजा (BCA, तृतीय वर्ष), विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून विक्रांत आर. पवार (सिव्हिल, तृतीय वर्ष) व सुमित खैरे (मेकॅनिकल, प्रथम वर्ष), शैक्षणिक प्रतिनिधी म्हणून हृषिकेश चोपडे (AI, तृतीय वर्ष) व प्रणाली सोनार (MBA, प्रथम वर्ष), सचिव रिया भंगाळे (E&TC, तृतीय वर्ष), सहसचिव प्रथमेश ए. गोसावी (सिव्हिल, तृतीय वर्ष), खजिनदार नकुल महाजन (EE, तृतीय वर्ष) व सहखजिनदार उमेश झुरके (AIML, तृतीय वर्ष) व श्रेयश पी. शेजवळ (AI, तृतीय वर्ष) यांची निवड करण्यात आली आहे.

तांत्रिक समितीमध्ये गौरव महाजन (EE, तृतीय वर्ष) हे तांत्रिक प्रमुख असून हर्शल वी. पाटील (DS, द्वितीय वर्ष),  शिवम ए. जाधव (BBA DA, द्वितीय वर्ष) व आकाश पी. पात्रा (BBA, तृतीय वर्ष) हे जनसंपर्क समिती मध्ये आहेत.

सांस्कृतिक समितीमध्ये प्रतीक्षा चव्हाण (MBA, द्वितीय वर्ष) व राहुल सुरवाडे (मेकॅनिकल, तृतीय वर्ष) हे सांस्कृतिक प्रमुख असून स्वरदा ए. वनारे (EE, तृतीय वर्ष), प्रथमेश खंडेलवाल (BCA, तृतीय वर्ष), पनेरी बी. पाटील (IT, द्वितीय वर्ष), सायली एम. भावसार (IT, द्वितीय वर्ष), साहिल शेख (MBA, प्रथम वर्ष), प्रथमेश ए. वाणी (BSC, द्वितीय वर्ष), श्रावणी जी. जोशी (AIML, द्वितीय वर्ष) व जयेश के. मित्तल (MBA, द्वितीय वर्ष),भविका एस. चौधरी (मेकॅनिकल, द्वितीय वर्ष), पृथ्वीराजसिंग परदेशी (सिव्हिल, तृतीय वर्ष), निधी आर. बाजपेयी (CSE, तृतीय वर्ष), हार्दिक के. चौधरी (AI, प्रथम वर्ष) व झैयान ए. खाटीक (AI, प्रथम वर्ष) हे सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत.

क्रीडा समितीमध्ये तेजस बाविस्कर (सिव्हिल, तृतीय वर्ष) व नेहा व्ही. चौधरी (MBA, तृतीय वर्ष) हे क्रीडा प्रमुख असून प्रेम भावसार (DS, तृतीय वर्ष), धनश्री एस. पाटील (AIML, तृतीय वर्ष), खुशी एम. सूर्यवंशी (AI, द्वितीय वर्ष) व सूरज व्ही. खंडागळे (AIML, द्वितीय वर्ष) हे क्रीडा सदस्य आहेत.

शिस्त समितीमध्ये रिचर्ड पिंटो (BBA, तृतीय वर्ष), तेजस पी. पाटील (मेकॅनिकल, तृतीय वर्ष) हे शिस्त प्रमुख असून शहजाद आर. सय्यद (मेकॅनिकल, तृतीय वर्ष), पियुष साळुंखे (AIML, तृतीय वर्ष) व मानसीज झा (CSE, तृतीय वर्ष), संदीप सुरळकर (MBA, प्रथम वर्ष) व आवेज शेख (AI, द्वितीय वर्ष) हे सदस्य आहेत.

महिला प्रतिनिधी समितीमध्ये धनश्री महाजन (मेकॅनिकल, द्वितीय वर्ष) या महिला प्रतिनिधी प्रमुख असून सदस्य म्हणून खुशबू एस. ढाके (MBA, प्रथम वर्ष), पल्लवी एस. पाटील (CSE, द्वितीय वर्ष), पूनम पी. बाविस्कर (MBA, द्वितीय वर्ष) व हर्षदा एस. पाटील (E&TC, द्वितीय वर्ष) हे सदस्य कार्य पाहणार आहेत.

 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण