जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रमुख पाहुणे डॉ. पराग नाहाटा यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची भव्य परेड व देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर भारावला

जळगाव, ता. २७ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यास श्री. पराग नाहाटा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला श्रीफळ, पुष्प व माळ अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. पराग नाहाटा यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. भारताच्या संविधानामुळे नागरिकांना मिळालेले हक्क व कर्तव्ये यांची माहिती देत विद्यार्थ्यांनी शिस्त, देशप्रेम, प्रामाणिकपणा व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठी पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित करत प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड, देशभक्तीपर गीत, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक तसेच स्कूल कमिटी सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी यांनी विशेष कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण