जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “७७ वा प्रजासत्ताक दिन” उत्साहात साजरा
इनोव्हेशन, उद्योजकता आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश ; म्युझिक व डान्स क्लबचे देशभक्तीपर सादरीकरण
जळगाव, ता. २६ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ
इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या
संयुक्त विद्यमाने “७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त” जी. एच. रायसोनी
इस्टीट्यूटच्या भव्य प्रांगणात अभियांत्रिकी विभागातील संगणक अभियांत्रिकी (CSE) विभागातील टॉपर कु. श्रुतिका विजय पाटील
तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) विभागातील टॉपर कु. प्रतिक्षा प्रमोद पाटील यांच्या हस्ते
ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या
प्रतिमेला श्रीफळ, पुष्प व माळ अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण व
राष्ट्रगीत झाले. यावेळी यांत्रिकी अभियांत्रिकी (FE Mech) मधील विद्यार्थी सुमित खैरे यांनीही
आपले विचार मांडले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना
जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी
स्टार्टअप संस्कृती, इनोव्हेशन
आणि इकोसिस्टम डेव्हलपमेंट या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नोकरी
शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, संशोधन, नवकल्पना व उद्योजकतेच्या माध्यमातून
‘विकसित भारत’ या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित
होत्या. कार्यक्रमात रायसोनी इस्टीट्यूटच्या म्युझिक क्लबच्या विद्यार्थ्यांनी
देशभक्तीपर समूहगीत सादर करून वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले. त्यानंतर
डान्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्येश चौधरी
(टीई बी.टेक एआयएमएल) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी समारोपाची घोषणा करून मिठाई
वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या
प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.



Comments
Post a Comment