जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये “नीव” तीन दिवसीय एम्प्लॉई स्पोर्ट्स–कल्चरल मिट व पिकनिक उत्साहात संपन्न

माइंडफुलनेस, विश्रांती व तणाव व्यवस्थापनासाठी क्रीडा–सांस्कृतिक महोत्सव व सहलीचे एकत्रित आयोजन; प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. १९ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट अंतर्गत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सहकाऱ्यांसाठी एम्प्लॉई एनुअल स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरल मिट अर्थात “नीव” हा १९ वा वार्षिक आनंदोत्सव आणि स्टाफ पिकनिक हे दोन्ही उपक्रम नव्या उत्साहात व व्यापक सहभागासह यशस्वीरीत्या पार पडले. दैनंदिन कामकाजातील ताणतणाव कमी करणे, सहकाऱ्यांमधील सुसंवाद व दृढ नातेसंबंध वृद्धिंगत करणे, माइंडफुलनेस वाढविणे तसेच नव्या उर्जेने कामास सुरुवात करण्याची प्रेरणा देणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता.

तीन दिवस चाललेल्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात समूह गायन, समूह व एकल नृत्य, वैयक्तिक गायन, पारंपरिक वेशभूषा, बॉलिवूड थीम, फॅशन शो, काव्यवाचन, नाटक, मिमिक्री यांसह क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम, बॅडमिंटन, संगीत खुर्ची, रस्सीखेच आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी, बिझनेस मॅनेजमेंट, कनिष्ठ महाविद्यालय व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील सुमारे ३०० हून अधिक सहकाऱ्यांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपल्यातील कलाकार जिवंत ठेवला व आयुष्याची “नीव” अधिक मजबूत केली.

या आनंदोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, “रायसोनी इन्स्टिट्यूटची यशस्वी वाटचाल ही येथील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सहकाऱ्यांच्या निष्ठा, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळेच शक्य झाली आहे. सहकारी आनंदी, समाधानी आणि तणावमुक्त असतील, तरच संस्थेचा सर्वांगीण विकास घडतो. माहिती-तंत्रज्ञानामुळे कामकाजात गती व तत्परता वाढली असली, तरी त्याचबरोबर तणावही वाढलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला जशी कामातून थोडी विश्रांती घेण्याची, थांबण्याची आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज असते, तशी संधी ‘नीव’सारख्या उपक्रमांमधून मिळते.”

त्यानी पुढे नमूद केले की, “आपल्या समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे स्वप्न आहे की, कॅम्पसमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक सहकाऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, परस्परांमधील नातेसंबंध अधिक सकारात्मक व्हावेत आणि प्रत्येकाला स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळावी. ‘नीव’ हा असा मंच आहे, जिथे सहकाऱ्यांमधील सुप्त कलागुण, कला आणि क्रीडागुण सादर करता येतात. विशेषतः अनेक महिला सहकारी घर आणि महाविद्यालयातील जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या व्यस्त असतात की त्यांना स्वतःसाठी वेळ काढणे कठीण जाते. अशा वेळी स्वतःसाठी थोडी स्पेस आणि वेळ काढणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”

“एम्प्लॉई स्पोर्ट्स–कल्चरल मिट आणि स्टाफ पिकनिकमधून सहकाऱ्यांच्या आयुष्यात अनेक सुखद आठवणी आणि अनुभव साठवले जातात, जे दीर्घकाळ ऊर्जा देणारे ठरतात. या उपक्रमांमधून वर्षभरासाठी नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. यावर्षीच्या क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांनीही अत्यंत आत्मविश्वासाने आणि धडाकेबाज खेळ करत क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली. हे सामने महाविद्यालयात नव्याने विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक टर्फ मैदानावर खेळविण्यात आले, ज्यामुळे सहकाऱ्यांना टर्फविषयी माहिती मिळाली तसेच संस्थेतील आधुनिक क्रीडा सुविधांचे प्रभावी दर्शन घडले,” असेही त्यांनी नमूद केले.

क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवानंतर व्यवस्थापनाच्या वतीने सहकाऱ्यांसाठी शासनाच्या पर्यटन विभागाचा अभूतपूर्व प्रकल्प ‘बॅकवूड्स इमराल्ड रिसॉर्ट’ येथे एकदिवसीय स्टाफ पिकनिकचे आयोजन करण्यात आले. रिसॉर्टमध्ये आगमनानंतर डबल-डेकर बोटी (क्रूझ) मधील डान्स फ्लोअरवरील लयबद्ध तालांवर सर्वांनी नृत्याचा आनंद घेतला. थिंग्स ऑफ द सॉंग, मिमिक्री, वन मिनिट गेम्स, पासिंग द बॅग यांसारख्या मनोरंजक खेळांबरोबरच स्वादिष्ट जेवण, ऍडव्हेंचर व वॉटर गेम्स, स्विमिंग, क्रिकेट, व्हॉलीबॉल/फुटबॉल आदी उपक्रमांमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. निसर्गसौंदर्याच्या सानिध्यात फोटोग्राफी व सेल्फी सत्रांनी या सहलीच्या आनंददायी आठवणी अधिक संस्मरणीय ठरल्या.

या सहलीच्या समारोपप्रसंगी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थित सहकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “अशा सहलींमुळे सहकाऱ्यांना कामकाजाच्या चौकटीबाहेर एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला वेळ मनाला स्थैर्य देतो आणि दैनंदिन आयुष्यातील एकसुरीपणातून बाहेर पडण्यास मदत करतो. असे मत त्यांनी व्यक्त केले.

क्रीडा, सांस्कृतिक तसेच सहलीच्या विविध उपक्रमांसाठी प्रा. रफिक शेख, प्रा. वसीम पटेल, एच. आर. श्री. मयूर गोपाले, प्रा. जितेंद्र वढदकर, श्री. अजय चौधरी तसेच क्रीडाविभागाचे सागर सोनवणे आदी समन्वयकांनी प्रभावी नियोजन व उत्कृष्ट अंमलबजावणी केली. त्यांच्या समन्वयपूर्ण कार्यामुळेच हे दोन्ही उपक्रम अत्यंत यशस्वी ठरले.

याप्रसंगी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी तसेच व्यवस्थापनाचे अशा आनंदोत्सव व सहलीचे आयोजन केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण