जी. एच. रायसोनी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन; पोर्टल लॉंच

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची आयडिया स्क्रीनिंग १–३१ जानेवारी ; अंतिम स्पर्धा रायसोनी महाविद्यालयात २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान, देशभरातील महाविद्यालयांना सहभागाचे आवाहन

जळगाव, ता. १ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीचा आरंभ झाला आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधून इच्छुक विद्यार्थी या स्पर्धेसाठी ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करू शकतात.

महाविद्यालयाच्या मुख्य प्रांगणात संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते हे पोर्टल लॉंच करण्यात आले. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. डॉ. निलेश इंगळे, प्रा. डॉ. चेतन चौधरी, तसेच अभियांत्रिकीतील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

लॉंच केलेल्या पोर्टलवर विद्यार्थी आता शासकीय विभाग, उद्योगक्षेत्र आणि सामाजिक समस्यांवर आधारित प्रकल्प तयार करू शकतात. या पोर्टलमध्ये संशोधन वृत्ती, संघभावना, तांत्रिक नवकल्पना आणि सर्जनशीलतेचा वापर करून स्पर्धेत सहभाग नोंदवला जातो.

जी. एच. रायसोनी महाविद्यालय आयोजित मागील वर्षीच्या स्पर्धेत ६० संघ अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यातील आयआयटी चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 'स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५' मध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तर रायसोनी महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. मुंबईच्या थडोमल शहाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला, तर आयआयटी रायपुरच्या संघाला विशेष कौतुक पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांनी हेल्थकेअर एप्लिकेशन, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी यासारख्या विषयांवर प्रकल्प सादर केले. स्पर्धेमध्ये ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

पोर्टल लॉंचिंगच्या कार्यक्रमात संबोधित करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, “जीएचआर- स्मार्ट इंडिया हॅकाथॉन-२.०” चे हे व्यासपीठ उत्तर महाराष्ट्रात दुसऱ्यांदा उपलब्ध करून देत देशव्यापी उपक्रम आयोजित करण्याचा अभिमान आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन वापर, प्रतिबंधित क्षेत्रातील तंत्रज्ञान यांसारख्या वास्तविक समस्यांवर उपाय विकसित करण्यासाठी आवाहन केले.  २८ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान रायसोनी महाविद्यालयात अंतिम स्पर्धा होणार आहे. यात संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स अशा विविध शाखांतील विद्यार्थी संघ सहभागी होऊ शकतात. तज्ज्ञ परीक्षकांकडून संकल्पनांचे मूल्यमापन करून पुढील टप्प्यासाठी गुणवत्ताधारक संघांची निवड केली जाईल. महाविद्यालय प्रशासनाकडून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अत्याधुनिक तांत्रिक सुविधा, मार्गदर्शन आणि पायाभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशभरातील इच्छुक महाविद्यालये आणि विद्यार्थी संघांनी वेळेत https://www.ghrhack.tech/ या पोर्टलवर नोंदणी करून राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण