जी. एच. रायसोनी महाविध्यालयात एमसीए, बीसीए व अभियांत्रिकी फ्रेशर्सचा जल्लोष
डीजे, गेम्स आणि विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
फ्रेशर्स पार्टीदरम्यान विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घालण्यासाठी विविध मनोरंजक आणि सहभागात्मक खेळांचे खास आयोजन करण्यात आले होते. मिनिट टू विन इट टास्क्स, रॅम्प वॉक फन राउंड, पास द बॉल, डम्ब शराड्स, कप स्टॅकिंग चॅलेंज, पेपर डान्स अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या सर्व खेळांमुळे नव्या विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, परस्पर ओळख आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झाले. खेळांच्या माध्यमातून निर्माण झालेला उत्साह, हशा आणि आनंदाने संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार बनला.
कार्यक्रमातील सर्वाधिक आकर्षण ठरलेल्या “मिस्टर आणि मिस फ्रेशर” स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यात एमसीए व बीसीए विभागातून प्रभावी सादरीकरण करत पुढीलप्रमाणे विजेतेपद पटकावले: मिस फ्रेशर (पदवी) – मोक्षदा पाटील, मिस फ्रेशर (पदव्युत्तर) – निकिता मुंडोकार, तर विशेष पुरस्कारांमध्ये बेस्ट पर्सनालिटी (पदवी) – साईश्री विकास माळी, बेस्ट पर्सनालिटी (एमसीए) – अंकिता सोनार, बेस्ट वॉक (पदवी) – सृष्टि पाटील, बेस्ट वॉक (पदव्युत्तर) – कोमल अमृतकर, तसेच बेस्ट अटायर (बीसीए) – गीतेंश पाटील आणि बेस्ट अटायर (एमसीए) – सोपान सोनवणे यांनी गुणवत्तापूर्ण कामगिरीसह पारितोषिके मिळवली.
अभियांत्रिकी विभागातूनही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट उत्साह दाखवत मिस्टर फ्रेशर – रोहन अंकुश काकडे आणि मिस फ्रेशर – स्नेहल प्रविण जगदाळे यांनी विजेतेपद पटकावले.
कार्यक्रमाच्या प्रमुख सत्रात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक अभ्यासक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, रायसोनी इन्स्टिट्यूटसारख्या ‘ऑटोनॉमस’ दर्जा प्राप्त संस्थेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, सुधारित परीक्षापद्धती आणि कौशल्यविकासाच्या असंख्य संधी उपलब्ध होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक संधीचा सकारात्मक उपयोग करावा.
तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की, “यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत नव्हे तर सातत्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. विविध उपक्रम, स्पर्धा आणि कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतल्याने व्यक्तिमत्त्व अधिक परिपूर्ण घडते. फ्रेशर्स पार्टीसारखे उपक्रम नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी जोडतात आणि त्यांच्यात आत्मियता निर्माण करतात. असे नमूद केले
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे आणि प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा.जितेंद्र वढदकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयन अभियांत्रिकी विभागातील प्रा. सुवर्णा सराफ, डॉ. ज्ञानेश्वर भावी आणि प्रा. अक्षय पाटील, तसेच एमसीए व बीसीए विभागातील प्रा. करिश्मा चौधरी, प्रा. मानसी तळेले, प्रा. प्रतीक्षा पाटील, प्रा. शुभम अडवाल, प्रा. मंगेश देओळे, प्रा. राहुल खंडारकर आणि प्रा. जुनैद खान यांनी उत्तमरित्या पार पाडले.
या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी विशेष कौतुक केले.

Comments
Post a Comment