जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “आंतरशालेय हॅकाथॉन २०२५”
जिल्ह्यातील विविध नामांकित शाळांचा उत्स्फूर्त सहभाग ; कोडिंगपासून AI पर्यंत – विद्यार्थ्यांनी दाखवली तांत्रिक झेप
जळगाव, ता. १० : शहरालगत
असलेल्या सावखेडा येथील
जी.
एच.
रायसोनी
पब्लिक
स्कूलच्यावतीने
“आंतरशालेय हॅकाथॉन २०२५” चे आयोजन उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील
विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी कोडिंग, अॅप
डेव्हलपमेंट आणि ए.आय. चॅटबॉट या
तीन स्तरांमध्ये आपल्या सर्जनशीलतेचा व तांत्रिक कौशल्यांचा उत्कृष्ट आविष्कार
सादर केला.
या हॅकाथॉन स्पर्धेत मायक्रो विजन अकॅडमी. रावेर, ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल. जळगाव, पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल. चोपडा, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल. चोपडा, विवेकानंद विद्यालय. चोपडा, तसेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल. जळगाव अशा अनेक स्कूलनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
स्पर्धेतील
विजेते :
स्तर १ – प्राथमिक गट
मायक्रो
विजन अकॅडमी, रावेर
विद्यार्थी – गौरव भोळे, काव्या पाटील, आर्या चौधरी
उत्तेजनार्थ : जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, जळगाव
विद्यार्थी – शनाया सोनी, दर्शी पलन, तृषा पाटील
स्तर
२ – मध्यम गट
ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव
विद्यार्थी – शुभम फेगडे,
युगल झिझुवाडिया,
आश्मित पंचपांडे
उत्तेजनार्थ
: पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा
विद्यार्थी – सोहम चौधरी,
श्वेतांबरी पाटील,
श्रावणी पाटील
स्तर ३ – उच्च गट (ए.आय. चॅटबॉट)
विवेकानंद
इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा
विद्यार्थी
– वेद चितरोड,
भाग्येश
चौधरी, नील चौधरी
उत्तेजनार्थ : पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा
विद्यार्थी
– सुयश मगर,
आदित्य
गुजर, मीत हेमंत पाटील
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना सृजनशील
दृष्टिकोन, तांत्रिक कौशल्यांचा विकास आणि संघभावना
वाढविण्याची मौल्यवान संधी मिळाली.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन जी.
एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली
पार पडले. स्कूलच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक
अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment