जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये जल्लोषात बालदिन साजरा
शिक्षकांच्या रंगतदार कलाप्रस्तुतींनी विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला ; मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांचे मार्गदर्शन
जळगाव, ता. १४ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा
करण्यात आला. संपूर्ण शाळा रंगीत फुग्यांनी, आकर्षक सजावटीने आणि बालदिन संदेशांनी सजवण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नेहरूजींना अभिवादन
करत बालदिनाचे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी महत्त्व जाणून घेतले. यानंतर शिक्षकांनी
विद्यार्थ्यांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. गाणी, नृत्य, विनोदी भारूड,
लघुनाटिका
यांसारख्या कलाप्रस्तुतींनी विद्यार्थ्यांचे प्रचंड मनोरंजन झाले.
विद्यार्थ्यांनीही टाळ्यांच्या गजरात शिक्षकांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल
परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी बालदिनाचे महत्त्व सांगत
विद्यार्थ्यांना स्वप्ने मोठी ठेवण्याचा आणि त्यासाठी मेहनत घेण्याचा संदेश दिला.
सूत्रसंचालन शिक्षिका स्मिता भामरे यांनी उत्साहपूर्ण शैलीत
उत्कृष्टरीत्या पार पाडले. शाळेच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी
शिक्षकांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांच्या समर्पित प्रयत्नांना दाद दिली व
विद्यार्थ्यांना आनंदी आणि सर्जनशील वातावरण देण्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात शिक्षक-विद्यार्थ्यांमधील मैत्रीपूर्ण नात्याचा साज चढला आणि बालदिन
संस्मरणीय ठरला.
Comments
Post a Comment