विभागीय टोस्टमास्टर्स स्पर्धेत जी. एच. रायसोनीचे विध्यार्थी ठरले विजयी वक्ते

रिया भंगाळे ठरली विजेती, स्वप्निलचा तृतीय क्रमांक; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या प्रेरणेतून रायसोनी महाविध्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

जळगाव, ता. १२ : इंदूर येथील अ‍ॅक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च येथे नुकतीच टोस्टमास्टर्स एरिया ए–३ आणि ए–४ संयुक्त वक्तृत्व आणि संवादकौशल्य मूल्यांकन स्पर्धा म्हणजेच ‘अरेना १.०’ पार पडली. या स्पर्धेत दोन्ही क्षेत्रांतील विविध क्लबमधील टोस्टमास्टर्स सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या स्पर्धेत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील “रायसोनी माएस्ट्रो टोस्टमास्टर्स क्लब” कडून टी. एम. स्वप्निल श्रावणे आणि टी. एम. रिया भंगाळे यांनी वक्तृत्व स्पर्धेत, तर टी. एम. गोविंद मंधान आणि टी. एम. प्रियल सोनवणे यांनी संवादकौशल्य मूल्यांकन स्पर्धेत सहभाग नोंदवला.

टी. एम. रिया भंगाळे हिने आपल्या वक्तृत्वातील चातुर्य आणि प्रभावी मांडणीद्वारे परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक, तर टी. एम. स्वप्निल श्रावणे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून तृतीय क्रमांक पटकावला. रिया भंगाळे आता एरिया ए–३ चे प्रतिनिधित्व करत डिव्हिजन स्तरावरील स्पर्धेत भाग घेणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सर्व सहभागी विध्यार्थ्यांच्या यशाबद्दल बोलताना नमूद केले की, उत्तर महाराष्ट्रातून एकमेव जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकला आणि नेतृत्वगुणांच्या जडणघडणीसाठी “टोस्टमास्टर्स क्लब” हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्याचा अभिमान आम्हाला वाटतो. टोस्टमास्टर्स क्लब हा केवळ लीडरशिप डेव्हलपमेंट किंवा कम्युनिकेशन स्किल्स शिकविण्यापुरता मर्यादित नाही; तर यात कॉन्फिडन्स बिल्डिंग, टाईम मॅनेजमेंट, डिसिप्लिन, ग्रॅमॅटिकल अचूकता आणि प्रभावी शरीरभाषा या कॉर्पोरेट जगतात आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांचा समावेश आहे.

टोस्टमास्टर्सच्या प्रत्येक सत्रात “प्रीपेड स्पीच”, “ह्युमरस स्पीच”, “इव्हॅल्युएशन”, “टाईम मॅनेजमेंट” यासारख्या घटकांवर काटेकोरपणे लक्ष दिले जाते. कोण किती वेळ बोलले, योग्य शब्दांचा वापर झाला का, शुद्ध भाषेचा आणि भावनांचा समतोल राखला का, हे सर्व बारकाईने मूल्यांकन केले जाते. त्यामुळे विद्यार्थी केवळ वक्तृत्व नव्हे, तर प्रभावी संवादक आणि जबाबदार टीम मेंबर म्हणून घडतात.

टोस्टमास्टर्स क्लब ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून जगभरातील अनेक कॉर्पोरेट कर्मचारीही याचे सदस्य आहेत. अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी यांचे नेहमीच व्हिजन राहिले आहे की विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे, तर जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सकारात्मक मूल्यांची जोड दिली पाहिजे.

टोस्टमास्टर्सच्या माध्यमातून विद्यार्थी प्रभावी मीटिंग कशी कंडक्ट करायची, प्रोटोकॉल कसे पाळायचे, आणि संवाद व शिस्त यांचा समन्वय कसा राखायचा हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात. त्यामुळे रायसोनी संस्थेतील टोस्टमास्टर्स क्लब हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक सशक्त मंच ठरला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

“अरेना १.०” या स्पर्धेत एरिया ए–३ आणि ए–४ मधील ९ हून अधिक क्लब्सनी सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थ्यांना प्रा. प्रिया टेकवानी यांचे सहकार्य लाभले. अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण