जी. एच. रायसोनी महाविद्यालयात 'वंदे मातरम'चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव !

राष्ट्रीय गीताच्या गौरवासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग – देशभक्तीचा जल्लोष

जळगाव, ता. : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, वक्तृत्व स्पर्धा, समूहगान आणि नृत्याद्वारे “वंदे मातरम”चा गौरव साजरा केला. या प्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे करण्यात आले. 
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणास्थळी आहे. या गीताने देशभक्तीची ज्योत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रज्वलित केली.” कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे “वंदे मातरम”चे सामूहिक गायन केले. महाविद्यालय परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल जोशी यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. वसीम पटेल यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण