AICTE च्या “युक्ती इनोव्हेशन चॅलेंज 2025” मध्ये रायसोनी महाविद्यालयाचे वर्चस्व – ७ संघाची भव्य निवड !
राष्ट्रीय पातळीवर रायसोनीच्या नवकल्पनांचा झेंडा ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
या सात संघापैकी सहा संघ विद्यार्थ्यांच्या असून एक संघ
प्राध्यापकांचा आहे. निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये विविध तंत्रज्ञान क्षेत्रांतील
संशोधन, समाजोपयोगी कल्पना आणि आधुनिक तांत्रिक उपायांचा समावेश असून यामध्ये, १. एआय-बेस्ड अॅकूस्टिक
वेव्ह मॉनिटरिंग ऑफ रेल डीफेक्ट्स लाईक क्रॅक्स, फ्रॅक्चर अॅण्ड प्रेडिक्शन फॉर रेल वेअर, क्वालिटी –
स्वप्निल श्रावणे, २. न्यू एज वूमन सेफ्टी ॲप – प्रणव प्रल्हाद पाटील, ३. ज्ञानवृक्ष
– विद्या मनोज बविस्कर ४. आरोग्यसेतु नेक्स्ट – विद्या मनोज बविस्कर ५. लाईफसेव्हर+
– मनीष दिलीप नेमाडे ६. इंटरनेट ऑफ थिंग्स
(IoT)
आधारित ब्रेक प्रेशर मॉनिटरिंग प्रणाली – साक्षी सुरेश लोखंडे ७. डीप
लर्निंग-बेस्ड रिअल-टाईम कॅप्शनिंग सिस्टीम फॉर इन्हॅन्सिंग व्हिज्युअल
ॲक्सेसिबिलिटी – प्रा. शरयु बॉंडे या ७ अभिनव प्रकल्पांना देशव्यापी मान्यता मिळाली
आहे.
यावेळी निवड झालेल्या विध्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन
करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी
नमूद केले कि, “AICTE च्या ‘युक्ती इनोव्हेशन चॅलेंज 2025’ मध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या सात
संघांची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. हे यश आमच्या विद्यार्थ्यांच्या
कल्पकतेचे, प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे आणि
संस्थेच्या सततच्या संशोधनप्रधान वातावरणाचे फलित असून, राष्ट्रीय पातळीवर
रायसोनीच्या नवकल्पनांचा झेंडा फडकविण्याचे कार्य आमच्या विद्यार्थ्यांनी केले
आहे. त्यांच्या संशोधनाभिमुख दृष्टिकोनामुळे आणि समाजोपयोगी प्रकल्पांमुळे
संस्थेचा ‘इनोव्हेशन इकोसिस्टम’ अधिक सक्षम झाला आहे. ‘AICTE’ च्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याची आणि
त्यांना उत्पादकतेच्या स्तरावर नेण्याची संधी मिळते — ही आमच्यासाठी प्रेरणादायी
बाब आहे. मी सर्व निवड झालेल्या टीम्स, त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापक, आणि संबंधित विभागप्रमुखांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. भविष्यातही रायसोनी महाविध्यालय
असेच नवे आयाम गाठत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवकल्पनांचे उदाहरण
प्रस्थापित करेल, असा मला विश्वास आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्रा. डॉ.
निलेश इंगळे (संचालक – IIC व विभागप्रमुख, माहिती तंत्रज्ञान आणि डेटा सायन्स विभाग), डॉ. स्वाती पाटील (विभागप्रमुख, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग विभाग) आणि डॉ. चेतन चौधरी (विभागप्रमुख, संगणक विज्ञान विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या
उपक्रमासाठी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे सहकार्य लाभले. तसेच या
उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी
यांनी सर्व टीम्सचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील पातळीवर अधिक मोठे यश संपादन करण्यासाठी
शुभेच्छा दिल्या आहेत.
.jpeg)
Comments
Post a Comment