जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभिरुप युवा संसद”

लोकसभेतील कामकाज नेमके कसे चालते, तेथे होणाऱ्या चर्चा कशा असतात, हे युवा वर्गाने जाणून घेण्यासाठी “रोटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी”तर्फे उपक्रम ; विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

जळगाव, ता. ५ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे विविध शैक्षणिक व युवा विकासासाठी उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अभिरूप युवा संसद नुकतीच पार पडली. संसदेत नेमके काय चालते. तेथे असलेल्या मंत्र्यांना कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, सदस्य आपापल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व कसे करतात याबाबतची माहिती युवक विध्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खऱ्याखुऱ्या संसदेसारखे वाद-विवाद आणि चर्चा या युवा संसदेत रंगल्या होत्या. लोकशाहीत वाद-विवाद तसेच चर्चेचे महत्त्व किती आहे, हे यानिमित्ताने अधोरेखीत झाल्याच्या भावना सहभागी झालेल्या विध्यार्थ्यानी व्यक्त केल्या.

यावेळी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या प्रमुख मार्गदर्शक म्हणून या उपक्रमाला उपस्थित होत्या, त्यांनी युवकांमध्ये लोकशाही मूल्यांचे संस्कार, संसदीय पद्धतीचा आचार-विचार, हजरजबाबीपणा, वक्तृत्त्व व वाद-संवाद या गुणांचा विकास व्हावा तसेच संसदीय लोकशाहीचे कामकाज कसे चालते हे विध्यार्थ्यानी अभ्यासावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद केले.

या युवा संसदेत प्रश्नोत्तरे तसेच अनेक महत्त्वाच्या विधेयकावर व्यापक चर्चा झाली. पंतप्रधान, गृहमंत्री, सभापती, विरोधी पक्षनेते आणि मंत्रिमंडळाची भूमिका विध्यार्थ्यानी पार पाडली. तसेच अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील व प्रा. धनेश पाटील यांनी या युवा संसदेचे परीक्षक म्हणून काम पाहिले तर प्रा. श्रिया कोगटा यांनी या संपूर्ण उपक्रमाचे समन्वय साधले.

 

या विषयावर चर्चा

अभिरूप संसदेत प्रामुख्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तयारी, ग्लोबल अर्थ, चंद्रयान, सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच अर्थसंकल्पामुळे देशातील आर्थिक बदलावरची चर्चा अधिकच रंगली.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण