जी. एच. रायसोनी महाविध्यालयात स्व.ग्यानचंदजी रायसोनी यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य महा”रक्तदान” शिबिर संपन्न

रक्तदान शिबिरात १५० रक्त पिशव्या संकलीत करत गाठला विक्रमी आकडा ; विध्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, ता. ७ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे प्रेरणास्थान स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या २७ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी श्रद्धा मैट्सचे संचालक श्री.रोहन रायसोनी यांनी आपल्या आजोबांच्या पुण्यतिथी निमित्त आधी स्वतः रक्तदान करून उपक्रमाला सुरुवात केली व या स्वैच्छिक रक्तदानाद्वारे जीव वाचवण्याच्या या उदात्त कार्यात योगदान देण्यासाठी सर्व विध्यार्थ्यानी एकत्र येऊन या उपक्रमाला उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून शिबिर कालावधीत रक्तदात्यांची आस्थेने विचारपूस करून मनोबल वाढवत रक्तसंकलनाची प्रक्रिया विभागप्रमुख, प्राध्यापक व विध्यार्थ्यांना समजावून सांगितली व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सहकारी यांनी स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या शिबिरामध्ये एकूण २५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला व एकूण १५० रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले. शिबिराच्या समारोपावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप पालवी यांनी महाविद्यालयास स्मृतीचिन्ह व गौरव पत्र देवून महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. तसेच विध्यार्थ्यांचा उत्साह व शिबिराचे सुव्यवस्थित आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. या शिबिराकरिता रायसोनी इस्टीट्यूटचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य समन्वयक प्रा.अमोल जोशी यांनी संयोजनाची भूमिका पार पाडली तर यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी हे उपस्थित होते. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण