“विक्रीतून व्यवस्थापनाचे धडे” घेण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी उतरले “रस्त्यावर”

तेजी हो या मंदी खूब चलेगी मंडी” – रायसोनीचा उपक्रम शहरवासीयांनी देखील केले विध्यार्थ्यांचे कौतुक
जळगावता. ५ - उत्पादन विक्रीचे प्रत्यक्ष बाजारात जाऊन अनुभवात्मक शिक्षण देण्याचे काम रायसोनी मंडीतून प्राप्त व्हावे या हेतूने जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयामध्ये रायसोनी-मंडी २०२५ या उपक्रमाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. यात प्रशिक्षणप्रत्यक्ष बाजारात जाऊन वस्तू विक्री तसेच अनुभव कथन या पद्धतीने हा तीन दिवसीय उपक्रम संपन्न झाला.

उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्व.ग्यानचंदजी रायसोनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर वसंत सुपरशॉपीचे संचालक श्री. नितीन रेदासिनी, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अमर मिल्क प्रोडक्ट्सचे संचालक श्री. अमर खत्री, श्रद्धा मैट्सचे संचालक श्री.रोहन रायसोनी, इटरणो इंडियाच्या संचालिका सौ. अनुश्री रायसोनी, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील हे उपस्थित होते. यावेळी उपक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, २००८ म्हणजेच महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आम्ही रायसोनी-मंडी हा उपक्रम राबवीत आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप आधीपासूनच आमच्या महाविद्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. मुख्यतः बिजनेस मॅनेजमेट हा विषय वर्गात थेरी शिकवण्याबरोबरच बाहेरच्या वातावरणात जात तेथील विविध प्रात्यक्षिक ज्ञान घेणारा विषय आहे. रायसोनी मंडी या उपक्रमातून विध्यार्थी लर्निग बाय सेलिंग” अनुभवतात म्हणजेच कि विध्यार्थ्यांना यातून नेतृत्व, टीमवर्क, टार्गेट सेट, नेट्वर्किंग, अर्थशास्त्रअकाउंटनियोजनडीसीजन मेकिंग यासारखे विविध विषय शिकता येतात तसेच व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी अनुभवातून घडावेतग्राहकांच्या गरजांची जाणीव त्यांनी समजून घ्यावी, वस्तूचे महत्व जाणून बाजारात उतरावे, तसेच आत्मविश्वासनेतृत्व गुणसंवाद कौशल्य,  या गुणांसह व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे असून प्रत्यक्ष विक्रीचे अनुभव मिळावेत या उद्देशाने रायसोनी मंडी हा तीन दिवसीय उपक्रम राबविण्यात येत आहे. बेहतर कमाई के लिए,बेहतर पढाई असे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या उपक्रमात मुंबई येथील एका सामाजिक संस्थेतून एक लाखाच्या वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या असून २०० विद्यार्थ्यांचा सहभाग यात आहे. उत्पादन विक्रीच्या माध्यमातून मिळणारा पैसा सामाजिक उपक्रमांसाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण व आरोग्यासाठी दिली जाणार असल्याची माहिती संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले. यानंतर वसंत सुपरशॉपीचे संचालक श्री. नितीन रेदासिनी यांनी म्हटले कि, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट सतत विविध उपक्रम राबवित असते. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा आत्मविश्वास प्रबळ होतो. मंडी” या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीव्यवहाराची माहिती व सखोल व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी नक्कीच मिळेल तसेच उत्पादनाची संपूर्ण माहिती विक्रेत्याला असायला हवी. अवगत भाषेवर प्रभूत्व महत्वाचे आहे. कोणतेही काम करीत असताना पारदर्शकता महत्वाची भूमिका पार पाडते याची जाणीव ठेवा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर अमर मिल्क प्रोडक्ट्सचे संचालक श्री. अमर खर्त्री यांनी म्हटले कि, व्यवसाय करण्यासाठी पुस्तकीज्ञाना इतकाच अनुभव महत्वाचा असतो आणि ते अनुभव रायसोनी मंडी सारख्या उपक्रमातून मिळतो. तसेच व्यवसाय करणे सोप नसून पात्र शिक्षणनेतुत्व करण्याचे धाडसजबाबदारीव्यवसायाची सुरक्षितता आणि वेळोवेळी करावी लागणारी सुधारणा या बाबी व्यवसाय क्षेत्रात महत्वाच्या ठरतात असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर श्रद्धा मैट्सचे संचालक श्री. रोहन रायसोनी यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, वस्तू विक्रीचे धडे आपल्या आतून विकसित झाली पाहिजेत. सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा तसेच प्रॉब्लेम सोल्विंग अप्रोच व सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल. आयुष्यात मनातील भिती कायमची काढून टाका, स्वतः प्रती चुकीची धारणा ओळखायला शिका. व्यवसाय करण्यासाठी पुस्तकीज्ञाना इतकाच अनुभव महत्वाचा असतो आणि ते अनुभव रायसोनी मंडी सारख्या उपक्रमातून मिळतो असे ते म्हटले, यांनतर सौ. अनुश्री रायसोनी यांनी मंडी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी फक्त विक्री आणि व्यवस्थापन शिकत नसून या उपक्रमातून ग्राहकांची मानसिकता जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच व्यवसायाचे प्रात्यक्षिके घेण्याचे व्यासपीठ मंडी असून यात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना उत्पादन विक्रीचे प्रात्यक्षिक दाखवून काही वस्तू विकल्यात. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी मंडीच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. या संपूर्ण उपक्रमाचे समन्वय एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. विशाल सुनील राणा, प्रा. श्रेया कोगटा यांनी साधले तसेच यावेळी प्रा. प्राची जगवानी,  प्रा. सरोज पाटील, प्रा. ज्योती जाखेटे व आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तन्मय भाले व आभार प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी मानले. तसेच या उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण