स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा “पाचवा पदवीप्रदान सोहळा” उत्साहात संपन्न

९६३ विद्यार्थ्यांना पदवी बहाल; १२ सुवर्ण व १३ रौप्य पदक विजेत्यांचा गौरव, विद्यार्थ्यांसह पालकांचा अभिमानाचा क्षण

जळगाव, ता. १०  : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय येथे पाचव्या पदवीप्रदान (Graduation Ceremony) सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या समारंभात एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए तसेच विविध अभियांत्रिकी शाखांतील एकूण ९६३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

या समारंभास व्हेगा केमिकल्स, जळगावचे सीएमडी श्री. भालचंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील व कुलसचिव डॉ. विनोद पाटील हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व परीक्षा नियंत्रक श्री. गौरव तिवारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रगीताने समारंभाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.

या समारंभाच्या प्रास्ताविकात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व कौशल्यविकास क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी नमूद केले की, रायसोनी महाविद्यालयाने स्थापनेपासून गुणवत्तापूर्ण व उद्योगाभिमुख शिक्षणाची परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मेजर-मायनर प्रणाली, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू व इंडियन नॉलेज सिस्टीम यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी महाविद्यालयात करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

संशोधन व नवकल्पनांना चालना देण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामार्फत स्टार्ट-अप, उद्योजकता विकास, डिझाईन थिंकिंग, इनोव्हेशन व पेटंट फायलिंग यांसारख्या विषयांवर विविध कार्यशाळा व परिसंवाद आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उद्योगानुभव मिळावा यासाठी विविध औद्योगिक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले असून व्यक्तिमत्व विकासासाठी टोस्टमास्टर्स, लेट्स टॉक, म्युझिक, डान्स, फॅब्रिकेशन व फोटोग्राफी क्लब यांसारखे उपक्रम राबविले जातात. महाविद्यालयात आयोजित पिनॅकल आयटी फेस्ट, स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.० तसेच डीपेक्स प्रादेशिक प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्राध्यापकांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व एआयसीटीईच्या सहाय्याने अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी व इनोव्हेटिव्ह विचारसरणी विकसित करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी रायसोनी ग्रुपचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व कार्यकारी संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा व्हेगा केमिकल्सचे सीएमडी श्री. भालचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या जीवनातील संघर्ष व यशाची कहाणी विद्यार्थ्यांसमोर मांडत मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वतःमध्ये जिद्द निर्माण करावी लागते. “जर सकाळी ठरलेल्या वेळी उठता येत नसेल, तर स्वतःला उठवून दाखवण्याची जिद्द निर्माण करा; अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची ताकद ठेवा, आज तुम्ही कोणत्या घरातून आला आहात किंवा तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा आयुष्यात स्वतःच्या कष्टावर उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा लिहिलेलाच असतो आणि तो स्वीकारून त्यावर मात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. यश आणि अपयश हे जीवनाचे अविभाज्य भाग असून अपयशातून शिकत पुढे जाणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी नमूद केले.विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणातून मिळालेल्या संधीचे मोल ओळखून मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर जीवनात पुढे जावे, असे आवाहन करत त्यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा. योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, पदवी संपादन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. शिक्षणातून मिळालेले ज्ञान आणि कौशल्यांचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच डॉ. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, सतत शिकत राहण्याचा आणि नवनवीन संधी स्वीकारण्याचा सल्ला दिला.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध शाखांतील ९६३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

१२ विद्यार्थ्यांनी “सुवर्ण पदक” तर १३ विद्यार्थ्यांनी “रौप्य पदक” पटकाविले

पाचव्या पदवीप्रदान सोहळ्यात विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये १२ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक तर १३ विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळविले.

सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी : प्रेरणा कल्पेश नागोरी (एमबीए), दिपिका कैलास महाजन (एमसीए), सुदर्शन दिनेश जैन (बीबीए), अंशिका महेंद्र पाटील (बीसीए), धनश्री पंडित पाटील (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी), दिनेश किशोर खैरनार (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी), पूनम संभाजी लांबोळे (सिव्हिल अभियांत्रिकी), मोहित चंद्रशेखर सोनवणे (मेकॅनिकल अभियांत्रिकी), प्रिती साहा (कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), विशाल भारत रुंगठा (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी), मोहित किशोर साळुंखे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), प्रियंका रविंद्र पवार (डेटा सायन्स) या गुणवंत विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकाविले.

रौप्य पदक विजेते विद्यार्थी : नॅन्सी नारायण आहुजा (एमबीए), नुपूर चंद्रकांत जोशी (एमसीए), मेहक सुनील जयसिंगाणी (बीबीए), निखिल गोविंद मिस्तरी (बीसीए), इशिता संजय पाटील (बीसीए), आदेश सुधाकर म्हस्के (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी), प्रथमेश संभाजी शिंदे (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी), सानिका संदीप राणे (सिव्हिल अभियांत्रिकी), मयूर सुनील पाटील (मेकॅनिकल अभियांत्रिकी), श्वेता राजेंद्र देशमुख (कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), प्रथमेश संतोष सुतार (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी), नेहा राजेंद्र साळुंखे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), प्रतीश दिवाकर कुलकर्णी (डेटा सायन्स) या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळविले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण