जी. एच. रायसोनी महाविद्यालय आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन –२.०’ स्पर्धेत “चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” अव्वल
आयआयटी चेन्नई व केआयटी कोल्हापूरला उपविजेतेपद; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात दुसऱ्यांदा सलग ३० तासांच्या स्पर्धेचे आयोजन; १८ राज्यांतील ७० शहरांमधून २८४ संघांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव,
ता. १ : जी. एच.
रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या वतीने आयोजित
‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन–२.०’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा उत्साहात
पार पडली. देशभरातील १८ राज्यांतील ७० शहरांमधून एकूण २८४ संघांनी सहभाग नोंदविला.
सलग ३० तासांच्या कोडिंग मॅरेथॉनमध्ये चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाने
प्रथम क्रमांक पटकावला. आयआयटी चेन्नई व कोल्हापूर
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपद संपादन केले, तर तृतीय क्रमांक जी. एच. रायसोनी
महाविद्यालयाच्या जळगाव व पुणे येथील संघांनी मिळवला.
विजेत्या संघांना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रांसह
पारितोषिकांचे धनादेश प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी ₹३०,०००/-, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी ₹२०,०००/-चे
दोन धनादेश, तर तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी ₹१०,०००/-चे
तीन धनादेश देण्यात आले. स्पर्धेत ट्रॅव्हल अँड टुरिझम, हेल्थ केअर, सर्व्हिस इंडस्ट्री, फार्मा, सायबर सिक्युरिटी तसेच गव्हर्नमेंट
सर्व्हिसेस आदी क्षेत्रांशी संबंधित समस्या-विधाने देण्यात आली होती. सहभागी
विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण आणि संशोधनाधारित उपाय सादर केले.
बक्षीस वितरण समारंभात या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद
केले की, उत्तर महाराष्ट्रात दुसऱ्यांदा आयोजित
करण्यात आलेल्या या हॅकाथॉनमुळे नवउद्योजक, संशोधक
आणि स्टार्टअप्सना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सायबर सुरक्षा, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी व्यवस्थापन, आयओटी आधारित वाहतूक नियंत्रण, ॲग्रिटेक नवकल्पना, टेलिमेडिसिन, डिजिटल हेल्थ मॉनिटरिंग, डेटा अॅनालिटिक्स, जलसंपदा व्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, एडटेक प्लॅटफॉर्म आणि ई-गव्हर्नन्स सेवा
सुलभीकरण अशा विविध विषयांवरील समस्यांचे निराकरण विद्यार्थ्यांनी “प्रॉब्लेम
सॉल्विंग अप्रोच” ठेवून यशस्वीरीत्या केले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमास श्रद्धा इंडस्ट्रीचे संचालक महेंद्र
रायसोनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करत
विद्यार्थ्यांना सातत्याने नवकल्पना करण्याचे, संशोधनवृत्ती
जोपासण्याचे आणि उद्योगविश्वाच्या गरजेनुसार तांत्रिक कौशल्य विकसित करण्याचे
आवाहन केले. “आजचे विजेते उद्याचे उद्योगनिर्माते ठरू शकतात; त्यामुळे इनोव्हेशन थांबवू नका,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नईच्या हेमा एन. एम., आकाश कुमार गुप्ता आणि हरजीत पी. यांनी
“ब्लॉकचेन-आधारित व्हिसलब्लोअर संरक्षण प्रणाली” हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर
केला. संवेदनशील माहिती सुरक्षितरीत्या नोंदविणे, तक्रारदाराची
गोपनीयता अबाधित ठेवणे आणि पारदर्शक व विश्वासार्ह तक्रार निवारण यंत्रणा उभारणे
या उद्देशाने हा प्रकल्प विकसित करण्यात आला असून, त्याच्या
अभिनव संकल्पना आणि तांत्रिक मांडणीचे परीक्षकांनी विशेष.
परीक्षक म्हणून गूगलमध्ये डेवऑप्स व क्लाऊड इंजिनिअर म्हणून
कार्यरत सलोनी सिंग, सीसीएफएल
इंडिया, पुणे
येथील सिनियर डेवऑप्स अभियंता जयेश चौधरी, टीसीएस पुणे येथील सिनियर डेव्हलपर तेजश्री भंगाळे, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे
परीक्षा नियंत्रक डॉ. योगेश पाटील व कॉम्प्युटर अप्लिकेशन विभागप्रमुख डॉ. अजय पाटील
यांनी भूमिका पार पाडली.
तसेच समन्वयक म्हणून अकॅडमिक डीन प्रा.
डॉ. संजय शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागप्रमुख
डॉ. चेतन चौधरी, आयटी/डेटा
सायन्स विभागप्रमुख डॉ. निलेश इंगळे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग
विभागप्रमुख डॉ. स्वाती पाटील यांच्यासोबत डॉ. दीपक नेमाडे, प्रा. शीतल जाधव, डॉ. पंकज देशमुख, प्रा. योगिता धांडे, प्रा. पूजा नवल, प्रा. शरयू बॉन्डे, प्रा. पल्लवी सुरवाडे, डॉ. हर्षल कोतवाल, प्रा. प्रियंका बर्डे, प्रा. प्रियांशी बोरसे, प्रा. आदर्श मंडल, प्रा. तुषार वाघ, प्रा. योगेश लांडगे, प्रा. साक्षी नारखेडे आणि प्रा. ऋशाली
काठोडे यांनीही परिश्रम घेतले. विद्यार्थी समन्वयक म्हणून आयुष अनुपम व अविजीत झा यांनीही स्पर्धेच्या यशस्वी
आयोजनात मोलाचे योगदान दिले. सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल रायसोनी
इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
सलग ३० तास सामाजिक प्रश्नांवर शोधली उत्तरे
ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ,ॲग्रिटेक, एडटेक, फिनटेक, हेल्थकेअर, सोशल इम्पेक्ट, सायबर टेक, एआयएमएल या संकल्पनांवर आधारित समस्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. मर्यादित वेळेत तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करत विद्यार्थ्यांनी नाविन्य, जटिलता, स्पष्टता, टिकाऊपणा, प्रभाव आणि वापरकर्ता अनुभव या निकषांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली. ही ३० तासांची अखंड कोडिंग व डेव्हलपमेंट स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी नवसंशोधन, कौशल्यविकास आणि टीमवर्कची प्रभावी संधी ठरली.


Comments
Post a Comment