जी. एच. रायसोनी महाविध्यालयात शिक्षण दिन साजरा ; मौलाना आझादांना अभिवादन
वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; तरुण वक्त्यांनी मांडले शिक्षणाचे सामाजिक भान
अभियांत्रिकी आणि बिझनेस मॅनेजमेंट शाखेतील विविध विभागांतील
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक प्रश्नांवर आपली मतं मांडली.
समाजातील शिक्षणाचे स्थान, ग्रामीण
व शहरी शिक्षणातील दरी, रोजगारक्षमता,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि स्थानिक प्रशासनातील शिक्षणाचे योगदान अशा विविध
अंगांनी तरुणाईने विषयाचा सखोल विचार केला.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर अकॅडमिक डीन
प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते
याप्रसंगी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात
नमूद केले की, “शिक्षण
हे केवळ ज्ञानार्जनाचे साधन नसून, ते
व्यक्तीच्या विचारक्षमतेला दिशा देणारे आणि समाजाला नवी दिशा देणारे शक्तिशाली
माध्यम आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान आजही
प्रेरणादायी आहे. त्यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया घालून ‘एकात्म शिक्षण’
या संकल्पनेला चालना दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत
भक्कम पायाभरणी केली. तसेच आजच्या युगात शिक्षणाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या
पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020)
हे अत्यंत दूरदृष्टीचे आणि सर्वसमावेशक धोरण आहे. या धोरणाचा उद्देश
विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर
समाजातील समस्यांच्या निराकरणासाठी तयार करणे हा आहे. ‘प्रॉब्लेम-सॉल्विंग
एज्युकेशन’ ही संकल्पना या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांनी या नव्या
शिक्षण दृष्टिकोनाचा स्वीकार करून समाजाच्या विकासात सक्रिय भूमिका घ्यावी.” तसेच
त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्याचा, विचारशीलता वाढवण्याचा आणि सामाजिक
संवेदनशीलता जोपासण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रा. सुरेखा वाणी यांनी
केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष
श्री. सुनीलजी रायसोनी यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले

Comments
Post a Comment