रायसोनी महाविध्यालयात वर्दीतील गायक ! संघपाल तायडे यांनी विध्यार्थ्यांसमोर उलगडला “पोलीस ते गायक होण्यापर्यंतचा जीवनप्रवास

ड्रामा क्लबचा उपक्रम ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव, ता. २९ : पोलीस' हा शब्द जरी उच्चारला तरी दरारा, धाक, कडक शिस्त असलेल्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु, जळगावात याच वर्दीतली गोड आवाजाची एक दर्दी व्यक्ती आहे. ती म्हणजे जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी संघपाल तायडे, ता. २९ मंगळवार रोजी शहरातील सुपरिचित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील ड्रामा क्लबच्या वतीने पोलीस कर्मचारी संघपाल तायडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. तायडे यांनी पोलीस ते गायक होण्यापर्यंतचा आपला जीवनप्रवास विध्यार्थ्यांसमोर उलगडला ते यावेळी म्हटले कि, २००७ मध्ये त्यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाली होती. काही वर्षे मुंबईत नोकरी केल्यानंतर बदली होऊन ते जळगावात आले. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी 'दुष्काळ' नावाच्या एका शॉर्टफिल्ममध्ये शेतकऱ्याची भूमिका केली होती. याच शॉर्टफिल्ममध्ये त्यांनी आपल्या गोड आवाजात 'तू ये रे पावसा...' हे गीत गायले होते. 3 वर्षांपूर्वी शिर्डी येथे बंदोबस्ताला असताना सकाळी सकाळी ते हेच गीत गु...