तेजी हो या मंदी खूब चलेगी मंडी – रायसोनीचा उपक्रम

विक्रीतून व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी २०० विद्यार्थी उतरले रस्त्यावर
जळगाव, ता.१७ - वस्तू विक्रीचे धडे आपल्या आतून विकसित झाली पाहिजेत. उत्पादनाची संपूर्ण माहिती विक्रेत्याला असायला हवी. अवगत भाषेवर प्रभूत्व महत्वाचे आहे. कोणत्याही बाबतीत संकोच वृत्ती हा वाईट गुणधर्म आहे. आयुष्यात मनातील भिती कायमची काढून टाका तरच यशस्वी होता येईल. स्वतः प्रती चुकीची धारणा ओळखायला शिका. कोणतेही काम करीत असताना पारदर्शकता महत्वाची भूमिका पार पाडते याची जाणीव ठेवा. व्यवसाय करण्यासाठी पुस्तकीज्ञाना इतकाच अनुभव महत्वाचा असतो आणि ते अनुभव रायसोनी मंडी सारख्या उपक्रमातून मिळतो. तसेच व्यवसाय करणे सोप नसून पात्र शिक्षण, नेतुत्व करण्याचे धाडस, जबाबदारी, व्यवसायाची सुरक्षितता आणि वेळोवेळी करावी लागणारी सुधारणा या बाबी व्यवसाय क्षेत्रात महत्वाच्या ठरतात. त्याच बरोबर उत्पादनाची जागरूकता, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, नेहमी सकारात्मक विचार यांचा पाया खूप भक्कम असला पाहिजे त्याशिवाय व्यवसायाची इमारत उभारने अवघड आहे. तेवढेच महत्वाचे म्हणजे व्यावसायिक शिक्षण झाले म्हणजे व्यवसाय करू शकतो असे नाही तर अनुभव देखील महत्वाचा आहे असे मत खानदेश मसालाचे संचालक श्री. नरेंद्र दोशी यांनी व्यक्त केले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेटमधील रायसोनी मंडी-२०२२ च्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सरस्वती मातेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ उपस्थित होते. उत्पादन विक्रीचे प्रत्यक्ष बाजारात जाऊन अनुभवात्मक शिक्षण देण्याचे काम रायसोनी मंडीतून प्राप्त व्हावे या हेतूने जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्टमध्ये रायसोनी मंडी २०२२ या उपक्रमाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष बाजारात जाऊन वस्तू विक्री आणि अनुभव कथन या पद्धतीने संपन्न झाले याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी मंडीच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. मुख्यतः बिजनेस मॅनेजमेट हा विषय वर्गात थेरी शिकवण्याबरोबरच बाहेरच्या वातावरणात जात तेथील विविध प्रात्यक्षिक ज्ञान घेणारा विषय आहे. रायसोनी मंडी या उपक्रमातून विध्यार्थी “लर्निग बाय सेलिंग” शिकतात म्हणजेच कि विध्यार्थ्यांना यातून अर्थशास्त्र, अकाउंट, नियोजन, डीसीजन मेकिंग यासारखे विविध विषय शिकता येतात तसेच शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर नोकरीची शोधाशोध व्हायला नको, व्यवस्थापन शास्राचे विद्यार्थी अनुभवातून घडावेत, ग्राहकांच्या गरजांची जाणीव समजून घेणे महत्वाचे आहे. वस्तूचे महत्व जाणून बाजारात उतरावे. तसेच आत्मविश्वास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, या गुनांसह व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे असून प्रत्यक्ष विक्रीचे अनुभव मिळावेत या उद्देशाने रायसोनी मंडी हा तीन दिवसीय उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या माध्यमातून विद्यार्थी फक्त विक्री आणि व्यवस्थापन शिकत नसून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांची मानसिकता जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एक लाखाच्या वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या असून २०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. उत्पादन विक्रीच्या माध्यमातून मिळणारा पैसा सामाजिक उपक्रमांसाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण व आरोग्यासाठी दिला जाणार आहे. बिझनेस करताना व्यवस्थापन अगोदर करावे, आपण निर्माण करीत असलेल्या उत्पादनाची बाजारात स्पर्धेची पडताळणी करून मंडी आपल्यासाठी व्यावसायिक उपक्रम आहे. त्यातून ग्राहक सेवा, ग्राहकाची अपेक्षा व खरेदी व विक्री यातील परिश्रम महत्वाचा असतो. वस्तू विक्री करतांना तुमचा प्रेमळ स्वभाव देखील महत्वाचा ठरतो असे मत नरेंद्र दोशी यांनी व्यक्त केले. तसेच व्यवसायाचे प्रात्यक्षिके घेण्याचे व्यासपीठ मंडी असून यात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना उत्पादन विक्रीचे प्रात्यक्षिक दाखवून काही वस्तू विकल्यात. यावेळी प्रा. रफिक शेख, प्रा.राज कांकरिया, प्रा.योगिता पाटील, प्रा. कल्याणी नेवे, प्रा ज्योती जाखेटे, प्रा. विनोद महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी व आभार प्रा. तन्मय भाले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश