रायसोनी महाविध्यालयात धुळवडीच्या सप्तरंगात न्हाली तरुणाई

पर्यावरण पुरक होळी व रंगपंचमीवर भर ; विध्यार्थ्यांनी उत्साहात नोंदविला सहभाग
जळगाव, ता. १७ : येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनी व प्राध्यापकांनीही होळीच्या रंगात मनसोक्त रंगत होळी साजरी केली. होळीच्या दिवशी महाविद्यालय सुरू असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनीनी आपल्यासोबत विविध प्रकारची रंग घेऊन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला रंगवायचे याच इराद्याने आले होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रांगणात होळीचा जल्लोष सुरु होता. यावेळी लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांची उधळण होऊन होळी रे होळी.. चा आवाज परिसरात घुमला. तसेच पाणी टंचाईचा प्रश्न् उन्हाळ्यात निर्माण होत असल्याने पाण्याची नासाडी टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहण्यास मिळाला. पर्यावरणपुरक रंगपंचमी साजरी करण्यावर या ठिकानी भर दिला. पाण्याची टंचाई असल्याने धूळवडीत पाणी न वापरता कोरड्या नैसर्गिक रंगाची वापर करत रंगपंचमी खेळण्यावर अधिक भर होता. सप्तरंगांची उधळण करत रायसोनी महाविद्यालय परिसर गजबजला होता. मुलींच्या वसतिगृहात सप्तसुरांच्या तालावर मुक्तपणे रंगाची उधळण सुरू होती. या उत्सवात प्राध्यापकासह इतर सहकारी सहभागी झाले होते

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश