रायसोनी मॅनेजमेंटच्या विध्यार्थ्यानी मूकनाट्य व संगीत सुरांनी वाहिली भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली

जळगाव, ता. २३ : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणारे थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज स्मृती दिन. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशासाठी दिलेले बलिदान व आदींचे वास्तवरूपी चित्र विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात मूकनाट्याच्या माध्यमातून मांडले व रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वास्तविक दर्शनाने व विविध गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित मूकनाट्य विध्यार्थ्यानी सादर केले. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा उपस्थित होते. शहीद दिनाच्या ओचीत्याने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट मूकनाट्याचे प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले. मूकनाट्य व गीत सादरीकरणात सुयश पाटील, साक्षी जैस्वानी, लीना जैन, गोविंद झा, विवेक पाटील, भूषण अडकमोल, धवल वायकोळे आदी विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला तसेच म्युझिक क्लबचे अक्षय दुसाने व वसिम पटेल यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतमजी रायसोनी यांनी कौतुक केले

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश