रायसोनी महाविध्यालयात जर्मन, जपानी, फ्रेंच व स्पेनिश भाषेचे प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना या चारपैकी कुठल्याही दोन भाषा शिकणे सक्तीचे; परदेशात उच्च शिक्षणाचा मार्ग होणार सुकर
जळगाव, ता. ५ : परदेशात शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवण्याची इच्छा प्रत्येकाला असते. असे असतानाही आर्थिक आणि भाषिक मजबुरीसह कठीण परीक्षांमुळे बहुतांश विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. जर्मन, जपान, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या सर्व देशांत शिकण्यासाठी तेथील भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (IELTS) ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील अनेक विद्यार्थी पदवीनंतर स्वतःहून परदेशात शिकत असले तरी बहुतेक विध्यार्थी भाषाज्ञानामुळे मागे पडतात. याच बाबीचा मागोवा घेत शहरातील ओटोनॉमस व सुपरिचित रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाने आपल्या अभ्यासक्रमात इलेक्टीव विषय देत जर्मन, जपानी, फ्रेंच व स्पेनिश भाषेचे वर्ग सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना या चारपैकी कुठल्याही दोन भाषा शिकणे सक्तीचे आहे तसेच महाविध्यालयात चारही भाषांचे प्राथमिक आणि प्रगत वर्ग घेतले जातात. यामध्ये देश विदेशातील भाषातज्ज्ञ भाषेचे वर्ग घेतात. यामुळे विद्यार्थ्यांची भाषेवर पकड मजबूत होत आहे. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, सध्याची जागतिक संधी ओळखत महाविध्यालयात विध्यार्थ्यांसाठी परदेशातील भाषा शिकणे सक्तीचे केले आहे मुळात परदेशी भाषा शिकल्याने आपण आपले जीवन बर्‍याच मार्गांनी वाढवू शकतो. नोकरीच्या संधी, नातेसंबंध आणि वैयक्तिक विकास यासारख्या गोष्टी सुधारण्यास भाषेमुळे मदत होते. दुर्दैवाने आणि कदाचित सामान्यत: जेव्हा इंग्रजी भाषेच्या वारसाने स्वतःहून इतर भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा ती अत्यंत आळशी वाटतात पण एकदा आपण दुसरी भाषा बोलू शकल्यास, बरेच दरवाजे अपोआप उघडतात. आमच्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी परदेशी भाषा का शिकली पाहिजे याकरिता आम्ही महाविध्यालयातच जर्मन आणि जपानी भाषेचे मोफत वर्ग सुरु केले आहे आणि या वर्गानाही विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती असते. सध्या महाविद्यालयात सुरु असलेल्या या भाषाज्ञानाच्या वर्गाना रायसोनी इस्टीट्यूट चे संचालक श्री. प्रितम रायसोनी व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश