विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी “स्वायत्त रायसोनी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला दिली भेट”
महाविद्यालयाकडून कुलगुरूंचा सत्कार ; परीक्षास्थळी असलेल्या उत्तम नियोजनाबद्दल कुलगुरूंनी केले समाधान व्यक्त
जळगाव, ता. २८ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा ‘स्वायत्तता दर्जा’ बहाल करण्यात आल्यानंतर रायसोनी महाविद्यालयाने कोरोनानंतर आपल्या महाविद्यालयात एमबीए, एमसीए व बीटेक या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा आयोजित केल्याने या परीक्षाचे नियोजन पाहण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी सोमवार ता. २८ रोजी रायसोनी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला भेट दिली यावेळी त्यांनी ऑटोनॉमस झाल्यानंतर प्रथम वर्षाची परीक्षा घेत असलेल्या रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील परीक्षांचे नियोजन पाहत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी परीक्षा नियंत्रण कक्षात जात परीक्षा कशापद्धतीने घेतली जात आहे याचा आढावा घेतला. तसेच यावेळी रायसोनी महाविद्यालयाकडून नवनियुक्त कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, श्री. महेंद्र रायसोनी, अॅकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, प्रा. तुषार पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. तन्मय भाले, प्रा. राज कांकरिया, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. बिपासा पात्रा, प्रा. स्वाती पाटील, प्रा दिपेनकुमार रजक व आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment