रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात नोसक्युल विथ मोंगोडीबीवर दोन दिवसीय कार्यशाळा

महाविद्यालयातील कॉम्युटर अॅप्लिकेशनच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती
जळगाव, ता. २१ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील कॉम्युटर अॅप्लिकेशन विभागातर्फे नोसक्युल विथ मोंगोडीबी या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पुणे येथील युनिकेन कंपनीचे असोसिएट टेक्नोलॉजी मॅनेजर श्री. कुंजनकुमार टेकडे यांनी विध्यार्थ्यांना मोंगोडीबी या नोसक्युल डेटाबेस प्रणालीबद्दल परिपूर्ण माहिती दिली. यावेळी सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना प्रा. कल्याणी नेवे यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच मोंगोडीबी या अॅप्लिकेशनबद्दलही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कुंजनकुमार टेकडे यांनी मोंगोडीबी एक मुक्त-स्रोत दस्तऐवज डेटाबेस आणि आघाडीचा नोसक्युल डेटाबेस आहे. मोंगोडीबी हा क्रॉस-प्लॅटफॉर्म, दस्तऐवज-देणारं डेटाबेस आहे जो उच्च कार्यक्षमता, उच्च उपलब्धता आणि सुलभ स्केलेबिलिटी प्रदान करतो. मोंगोडीबी संकलन आणि दस्तऐवज या संकल्पनेवर कार्य करते. नोस्कयुल डेटाबेस असल्याने, मोंगोडीबीमध्ये बरीच उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. या आश्चर्यकारक वैशिष्ट्यांमुळे हे तंत्र अतिशय अद्वितीय आणि आकर्षक बनते. तसेच संरचित डेटाबेसच्या तुलनेत हे खूप लवचिक आहे. मॅपिंग टाईप करण्याची गरज नाही. कोणताही दस्तऐवज प्राथमिक आणि दुय्यम निर्देशांकांसह अनुक्रमित करू शकतो अशी माहिती त्यांनी यावेळी विध्यार्थ्यांना दिली. या कार्यशाळेत विध्यार्थ्यानी मोठ्यासंख्येने सहभाग नोंदविला होता. यावेळी प्रा. रुपाली ढाके यांनी आभारप्रदर्शन केले तर कार्यशाळेसाठी विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, प्रा. करिष्मा चौधरी, प्रा. विनोद महाजन, प्रा. फातिमा चुनावला यांनी सहकार्य केले तसेच कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश