महिला सबलीकरण तेव्हाच घडेल जेव्हा समाजाची मानसिकता बदलेल : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात महिला सन्मान सप्ताहाची विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी सांगता
जळगाव, ता. १२ : समाजातील प्रत्येक घटकाने मुलींना समानतेची वागणूक देवून त्यांना शिकविले पाहिजे. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रत्येक निर्णयात समाविष्ट केले पाहिजे. तरच आपण त्यांना न्याय देऊ शकू, असे मार्गदर्शन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी ता.१२ शनिवार रोजी रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात "महिला दिन' अंतर्गत झालेल्या महिला सन्मान सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी केले. महाविद्यालयात महिला दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर आर्यन पार्कच्या संचालिका डॉ. रेखा महाजन या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. अग्रवाल पुढे म्हणाल्या कि, तोंडात ३२ दात असतात, ३२ दातातील एखादा दात किडतो तेव्हा त्यावर शस्रक्रिया करावी लागते. महिला सुरक्षा बाबतीतही असेच होत आहे. सगळेच पुरुष चुकीचे वागतात असे नाही, पण जो कुणी एक असतो त्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याला अद्दल घडली तर तो पुन्हा त्या मार्गी जाणार नाही. आपली संस्कृती पुरुषप्रदान संस्कृती म्हणून परिचित आहे, पण तसे राहिले नाही. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पुरुषांचा त्यांना पाठींबा मिळाला नसता तर कदाचित असे घडलेले बघायला मिळाले नसते. त्यामुळे पुरुषांनीदेखील महिलांच्या कामातील हिस्सा वाटून घेतला पाहिजे. महिलांना चूल आणि मुल पुरता मर्यादित न ठेवता त्यांना सन्मानाने जगविले पाहिजे. आदर, मान सन्मान द्यायला हवा; महिलांना घरातून सन्मान तरच बाहेर त्यांचा सन्मान होईल त्यांना चांगली वागणूक मिळेल असे मत प्रा. डॉ प्रिती अग्रवाल यांनी मांडले. यानंतर डॉ. रेखा महाजन यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, देशाच्या जडणघडणीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. कुणी परीक्षेत पहिली आली म्हणून, तर कुणी बोटीची कप्तान झाली म्हणून आमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो…पण स्वातंत्र्य द्यायची वेळ येते तेव्हा, रात्री उशिरापर्यंत बाहेर जाऊ नको, हे करिअर तुझ्यासाठी नाही, असे कपडे नको, अशा हज्जार बंधनात आम्हाला जखडून ठेवलं जातं. असा दुजाभाव कशासाठी? ‌‌स्त्रियांवर बंधनं लादण्यापेक्षा आपले विचार आणि नजर बदला. घरातून, समाजातून भक्कम पाठिंबा मिळाला, तर मुली आभाळाला गवसणी घालतायत. मग प्रत्येक दिवस महिला दिन असेल, असा आत्मविश्वास ‘महिला सन्मान सप्ताहा’च्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यासपीठावर व्यक्त केला. यावेळी काही विध्यार्थ्यानी समूहनृत्य, पोस्टर सादरीकरण, कविता वाचन केले तर महाविद्यालयाच्या म्युझिक क्लबच्या वतीने यावेळी विविध गीते सादर करण्यात आली. साक्षी वाणी व समीक्षा शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच प्रा. श्रिया कोगटा यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीस्वीतेसाठी प्रा. कल्याणी नेवे, प्रा. योगिता पाटील, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. प्राची जगवाणी यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतमजी रायसोनी यांनी कौतुक केले

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश