विद्यापीठीय विविध स्पर्धामध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या तब्बल “१२” विध्यार्थी खेळाडूंची निवड
जळगाव , ता. २७ : खानदेशातील विविध शहरांमध्ये पार पडलेल्या विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या १२ विध्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेत्रदीपक असे यश मिळवले. चेन्नई येथील एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कटनकुलथूर या ठिकाणी पार पडलेल्या मुलांच्या ‘स्विमिंग’ स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी भारत दिलीप चौधरी , शुभम युवराज काळे , धनश्री राजीव जाधव यांची निवड होऊन त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच मध्य प्रदेशातील अवधेश प्रताप सिंह विद्यापीठ येथे पार पडलेल्या (पुरुष गट) ‘टेबल टेनिस’ या क्रीडाप्रकारात बी.टेक विभागातील सिध्देश राजेश बगे या विध्यार्थ्याची निवड झाली होती. चंदीगड येथील पंजाब विद्यापीठ येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय ‘शुटींग’ या क्रीडाप्रकारात बी.टेक विभागातील सत्यजित मिलीद्कुमार गाढे याने कबचौउमविचे प्रतिनिधित्व केले. तसेच कुणाल विलास भावसार याने ‘तलवारबाजी’ या पुरुष गट क्रीडाप्रकारात जम्मू येथील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विद्यापीठ येथे सहभाग नोंदविला. त्याचबरो...