जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा ता.१४ रोजी “पदवीदान समारंभ”
विविध विद्याशाखेतील ७९३ स्नातकांना करण्यात येणार पदवी प्रदान ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांची माहिती
जळगाव, ता. ०८ : जी. एच. रायसोनी
कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयाचा २०२३-२४ या वर्षाचा “पदवीदान
समारंभ” दिनांक १४ मे २०२५, बुधवार रोजी
आयोजित करण्यात आला आहे. जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या
ऑडीटोरीयममध्ये सकाळी ११ च्या सुमारास हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्यात जी.
एच. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत
तर बीटा असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ डॉ. भरत अमळकर हे उपस्थित स्तानकांना उपदेश देणार आहे तसेच बोर्ड
ऑफ गव्हर्नन्स मेंबर व श्रद्धा मैट्सचे सीएमडी महेंद्र रायसोनी व विनले पॉलिमर्स
प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती हे प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभास
उपस्थित राहणार असल्याची माहिती जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.
डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली. तसेच या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांसमवेत
पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी
केले
या समारंभात एकूण ७९३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात
येणार असून यामध्ये एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, बी.ई.-आयटी, बी.ई.-ई अँड टी सी, बी.ई.-ईई, बी.ई.-सीई, बी.ई.-एमई, बी.ई.-सीएसई असे
सर्व शाखेचे एकूण ७९३ विद्यार्थ्यांचा या पदवीदान समारंभात समावेश असल्याची माहिती
जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली.
१२ विद्यार्थ्यांनी केली “सुवर्ण पदकां”ची कमाई
कुणाल लक्ष्मीकांत संगीता जैन (एमबीए), वैष्णवी चंद्रकांत कविता वाघ (एमसीए), सुरक्षा राजकुमार सोना वालबानी (बीबीए), कुशल भगवान आशा पाटील (बीसीए), गिरिजा चंद्रकांत अश्विनी शिंगाडे (बी.ई.-सीएसई), सय्यद शाहनवाझ अमिनुद्दीन (बी.ई.-आयटी) जाव्वाद सय्यद आसिफ
सय्यद (बी.ई.-एमई), घनश्याम मनोज कविता कठपाल (बी.ई.-सीई), ओम कमलाकर रंजन चौधरी (बी.ई.-ईई), पवन मनोहर सरला चव्हाण (बी.ई.-ई अँड टी सी), अनुराग घुरान अन्नू झा (बी.ई.-आयटी), रोहित दिलीप सेवंती अत्रे (बी.ई.-एआय), रुचिता शिवाजी पाटील (बी.ई.डीएस)
Comments
Post a Comment