यशस्वी भविष्यासाठी नॉलेज, अँटीट्युड व स्कील आत्मसात करा : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील बीसीए-एमसीए शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची “फेयरवेल पार्टी” उत्साहात संपन्न

जळगाव, ता. २५ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील “बीसीए-एमसीए” शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविध्यालयाच्या प्रशस्त अश्या सभागृहात पार पडला. यावेळी विध्यार्थ्यांसाठी विविध सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते. तर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, बीसीए-एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आपल्या यशस्वी भविष्यासाठी प्रत्येक युवकाने आता कम्पर्ट झोन च्या बाहेर येत नॉलेज, अॅटीट्युड व स्कील हि त्रिसूत्री आत्मसात करायला हवी. जर तुम्ही तुमच्या येणाऱ्या करियरमध्ये पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, तूम्ही जे काही काम करत आहात त्यात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. तुमचा प्रामाणिकपणाच तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. संकटांना न घाबरता मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा तसेच प्रॉब्लेम सोल्विंग अप्रोच व सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल. आपल्या जीवनामध्ये आई-वडील हे पहिले गुरु असतात त्यांचा सदैव आदर करत त्यांचे मार्गदर्शन घ्या, तसेच आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे यांचे विविध उदाहरणं देत त्यांनी मार्गदर्शन केले व आजच्या स्पर्धात्मक युगात जर ठीकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. रफिक शेख, प्रा. करिष्मा चौधरी, प्रा. रुपाली ढाके, प्रा. हर्शिदा तलरेजा, प्रा. शुभम अडवा, प्रा. मानसी तळेले, प्रा. प्रतीक्षा पाटील, प्रा. राहुल खंडारकर, प्रा. मंगेश देवळे, प्रा. सुजय नेरकर, प्रा. निकी वेद, प्रा. नटवर झा, प्रा. श्रुतिका सावळे, प्रा.ज्योती चौधरी, प्रा. रोहित कुमार आदींनी पार पाडली. यावेळी निरोप समारंभातील सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली तसेच यावेळी विध्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश