जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा १००% निकाल

दहावी सी.बी.एस.ई परीक्षेत यशस्वी प्रदर्शन ; नव्या शैक्षणिक धोरणानुसार इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रम राबविला

जळगाव, ता. २२ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने यंदाच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत दहावीमध्ये १०० टक्के निकाल मिळवत उल्लेखनीय शिक्षणाची परंपरा जपली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीतील हे आणखी एक यशस्वी पर्व ठरले आहे.

नुकताच सीबीएसई मंडळाने १३ मे रोजी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल उत्कृष्ठ असा लागला आहे. या वर्षीच्या टॉपर्समध्ये ऋतुजा भंडारी ९० टक्के, देवश्री चंद्रवंशी-89.6 टक्के,  सिद्धांत काबरा-८७.८ टक्के, हर्ष पाटील-८५.५ टक्के, हर्षित दरडा ७८.६ टक्के असे उत्तम गुण विध्यार्थ्यानी प्राप्त केले आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा म्हणाल्या कि, “या उल्लेखनीय निकालांमागे आमच्या सर्व शिक्षकांचा सातत्यपूर्ण समर्पणभाव, आणि शिक्षणातील उत्कंटता आहे. आमच्या स्कूलमध्ये रोबोटिक लॅब, तांत्रिक शिक्षण, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, आणि पालकांसोबत सातत्याने संपर्क ठेवण्याची विशेष व्यवस्था आहे. केवळ शैक्षणिकच नव्हे तर खेळ, कला, संस्कृती आणि सण साजरे करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर स्कूल भर देत असते, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिज्ञासा आणि मूल्यनिष्ठता रुजवण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून  आमचे मार्गदर्शक व जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे व्हिजन व स्कूलमधील शिक्षक तसेच इतर सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच “१०० टक्के सर्वोत्तम निकाल” या एक्सलन्स पातळीला गाठू शकलो. येत्या काळात पालकांच्या ज्या स्कूलकडून अपेक्षा आहेत त्या निश्चितच आम्ही पूर्ण करू. दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडणार नाही तसेच नवनवीन टेक्निकल विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील राहणार असून विध्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण आम्ही देत राहणार असे त्यांनी म्हटले.

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या निकालाबाबत व शाळा व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांना भेटलेल्या सर्वांगीण सुविधा बाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या यशामुळे जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ही जळगावातील भविष्य-केंद्रित, आणि दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून परत अधोरेखित झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश